Booster Dose Guidelines: देशभरासह राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग अधिक वाढवण्यावर पुन्हा एकदा भर दिला जात आहे. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले तरीही नागरिकांना कोरोना होत असल्याचे समोर येत आहे. अशातच परदेशात बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु अद्याप देशात आणि महाराष्ट्रात बूस्टर डोस देण्यास सुरुवात झालेली नाही, अशातच आता मुंबई महापालिकेकडून बूस्टर डोस येत्या 19 जानेवारी पासून दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात 24 तासात 36,265 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याचसोबत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर मुंबईत सुद्धा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला असून 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अशातच या संकटाच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यासह लसीकरणाचा वेग वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे. तर जाणून घ्या बूस्टर डोस संदर्भातील महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावली बद्दल अधिक.(Maharashtra Covid-19: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या चार कर्मचाऱ्यांची कोरोनाची लागण)
-10 जानेवारी पासून बूस्टर डोस फ्रंटलाइन वर्कर्स, 60 वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील नागरिकांना दिला जाणार आहे
-बूस्टर डोस घेण्यासाठी कोविड19 च्या दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झालेल्यांना तो घेता येणार आहे. तिसरा डोस घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा नोंदणीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे
-60 वर्ष किंवा त्यावरील नागरिकांना तिसरा डोस घ्यायचा असेल तर त्यांना कोणतेही प्रमाणपत्र दाखवावे लागणार नाही आहे. परंतु लसीचा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सांगण्यात आले आहे
-बूस्टर डोससाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यावा लागणार नाही आहे
-खासगी रुग्णालयात जाऊन जर नागरिकांना तिसरा डोस घ्यायचा असेल तर केंद्र सरकारने ठरविलेल्या किंमतीत तो घेता येणार आहे
नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रर करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना नोकरीचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र दाखवावे लागेल. आणखी महत्वाचे म्हणजे जर नागरिकांनी एकाच लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांना त्याचाच बूस्टर डोस दिला जाणार आहे.