पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता जगभरात या संकटाला रोखण्याचे प्रयत्न मोठ्या पातळीवर सुरु आहेत. अशातच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करण्याऐवजी डिजिटली जोडून राहावे असे मार्ग उपाययोजना म्ह्णून राबवण्यात येत आहेत, अनके बड्या कंपन्यांनी आपले कामकाज हे ऑनलाइनच करण्याची निर्णय सुद्धा घेतले आहेत. हा उपाय आंतराराष्ट्रीय स्तरावर राजकीय क्षेत्रात वापरण्यात यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विट मार्फत संपूर्ण दक्षिण आशियाई देशांच्या नेत्यांना केले होते, या ट्विटला उत्तर देताना पाकिस्तान सह अफगाणिस्तान (Afghanistan), बांगलादेश (Bangladesh), भूटान (Bhutan), मालदीव (Maldive), नेपाळ (Nepal), श्रीलंका (Srilanka) या देशांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कोरोना विषयी घेण्यात येणाऱ्या भेटीत प्रत्यक्षात बैठकीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची कल्पना नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी मांडली होती आता या कल्पनेला सर्व अन्य देशातील नेत्यांनी सुद्धा अनुमोदन दिले आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना, सर्व SAARC देशांना संबोधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे भेटीचे विनंती केली होती, आपण सर्वांनी एकत्र येऊन या कोरोनाला लढा द्यायला हवा,आणि जगासमोर उदाहरण बनायला हवे. आपल्या पृथ्वीवर आलेले संकट या मार्गाने दूर करता येईल असेही मोदींनी म्हंटले होते. COVID-19: कोरोना व्हायरस मुळे अमेरिकेत आणीबाणी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

नरेंद्र मोदी ट्विट

या ट्विटवर अनेक देशाच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवणारे उत्तर दिले आहे. भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पुढाकारचं कौतुक सुद्धा केले. "याला म्हणतात नेतृत्त्व. या प्रदेशातील सदस्य म्हणून आपण प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे. छोट्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे आपण समन्वय साधायलाच हवा. तुमच्या नेतृत्त्वात लवकरच सकारात्मक परिणाम दिसेल यात शंका नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी उत्सुक आहे." असे ट्विट शेरिंग यांनी केले आहे. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद सोलीह या सर्वांनी मोदींच्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे.

पहा ट्विट

दरम्यान याआधी पाकिस्तान या निर्णयाला पाठिंबा देणार का यावर जरा प्रश्नचिन्ह होते मात्र, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता आयशा फारुकी यांनी आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं. कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर समन्वय गरजेचा आहे, त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्यावरील विशेष सहाय्यक या परिषदेत भाग घेतील, असं त्यांनी म्हंटले आहे.