भारतातील हजारो लोकांचा डेटा ऑनलाईन लीक पण COWIN पोर्टलवरील सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा
Cyber Police | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

भारतातील हजारो लोकांचा व्यक्तिगत डेटा आणि एक शासकीय सर्वर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता आणि कोविड चाचणी निकाल यांचा समावेश आहे. लीक झालेल्या डेटाला रेड फोरम च्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. येथील एका सायबर गुन्हेगाराने 20 हजारांहून अधिक लोकांचा व्यक्तिगत डेटा असण्याचा दावा केला आहे.(Co-WIN येथे कोरोनावरील लस घेण्यासाठीएकाच मोबाइल क्रमांकावरुन 4 ऐवजी 6 जणांना रजिस्ट्रेशन करता येणार)

रेड फोरमवर टाकण्यात आलेल्या लोकांचे नाव, वय, लिंग, मोबाइल क्रमांक, पत्ता, तारीख आणि कोविड19 चे रिजल्ट्स कळू शकतात. सायबर सुरक्षा शोधकर्ता राजशेखर राजहरिया यांनी ट्विट केले की, व्यक्तिगत ओळखीची योग्य माहिती ज्यामध्ये नाव आणि कोविड19 च्या रिजल्टचा समावेश आहे. एका Content Delivery Network च्या माध्यमातून ही पब्लिक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Tweet:

राजहरिया यांनी ट्विट करत असे म्हटले की, PII ज्या मध्ये कोविड1ग आरटीपीसीआर रिजल्ट आणि कोविन डेटाचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता यांचा समावेश आहे. एका सरकारी सीडीएनच्या माध्यमातून लीक झाले आहे. गुगलने जवळजवळ 8 लाख सार्वजनिक आणि खासगी कागदपत्र सर्च इंजनमध्ये क्रमबद्ध केले आहेत. लोकांचा डेटा आता डार्कबेवर सूचीबद्ध आहे. परंतु तो वेगाने हटवण्याची गरज आहे. या संबंधित ईमेलच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून उत्तर मिळालेले नाही.(तुमचे Aadhar Card 'या' पद्धतीचे आहे? UIDAI ने केली महत्वाची घोषणा)

Tweet:

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले की, कोविन डेटा लीक प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. परंतु असे वाटते की, लीकचे हे प्रकरण कोविन संबंधित नाही आहे. कारण या अॅपच्या माध्यमातून आम्ही कोणाबद्दल जाणून घेत किंवा लसीकरणाबद्दल काही माहिती एकत्रित करत नाहीत. सरकारने असे म्हटले की, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे कोविन पोर्टलमध्ये एकत्रित करण्यात आलेला डेटा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे स्पष्ट होते की, कोविन पोर्टवरील डेटा लीक झालेला नाही आणि लोकांचा संपूर्ण डेटा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित आहे.