Aadhar Card (Photo Credits-Twitter)

महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्ड संबंधित UIDAI ने एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार असे म्हटले की, बहुतांश लोक आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक किंवा पीवीसीच्या रुपात कार्ड प्रिंट करतात. परंतु तुम्ही ते खुल्या बाजारात प्रिंट केले असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.(Life Insurance आणि General Insurance मध्ये 'हा' आहे मोठा फरक; जाणून घ्या सविस्तर)

खुल्या बाजारात जर तुम्ही प्लास्टिक किंवा पीव्हीसीच्या रुपात आधार कार्ड तयार केले असेल तर ते मान्य नसणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीचे कार्ड ओळखपत्र म्हणून दाखवत असाल तर तुम्ही आधाराकार्ड शिवाय असल्याचे मानले जाईल असे युआयडीआयएने म्हटले आहे. त्याचसोबत प्लास्टिक किंवा पीव्हीसी आधार कार्डमध्ये सुरक्षित असे फिचर्स नाही आहेत. यासाठी आम्ही घरबसल्या प्राधिकरणाने छापलेल्या पीव्हीसी आधार कार्डची ऑर्डर देण्याचा ऑप्शन देतो.

Tweet:

>अशाप्रकारे तयार करा PVC Aadhar Card

जर तुम्हाला प्लास्टिक किंवा पीव्हीसी आधार कार्ड तयार करायचा असेल तर UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला प्रथम भेट द्या. त्यानंतर तुम्हाला घरबसल्या स्पीड पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला ते आधार कार्ड मिळणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. या कार्डमध्ये तुमच्या आधार कार्डच्या अधिक माहितीसह QR Code सुद्धा दिला जातो. यामध्ये काही सिक्युरिटी फिचर आणि डेमोग्राफिक डिटेल्स सुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही mAadhar App च्या माध्यमातून आधार कार्ड ऑर्डर करा असे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही मायआधार अॅप डाऊनलोड करु शकता. येथे तुम्हाला तुमचे डिजिटल आधारकार्ड डाऊनलोड करता येणार आहे. हे कार्ड सुद्धा युआयडीएआय संबंधित सेवांपैकी मान्यताप्राप्त सेवा आहे.