COVAXIN Update: WHO कडून Bharat Biotech च्या 'कोवॅक्सिन' ला आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अजून कागदपत्रं सादर करण्याची गरज
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारतामध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी कोविड 19 लसीकरणाचा (COVID 19 Vaccine)  100 कोटींचा टप्पा पूर्ण झाला आहे. पण अद्याप संपूर्ण भारतीय बनावटीची कोवॅक्सिन (COVAXIN) ही लस जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापराच्या मंजूरीच्या प्रतिक्षा यादीमध्येच आहे. WHO ने अजूनही काही माहिती आणि कागदपत्र सादर करण्याचे आदेश भारत बायोटेक या लस निर्मिती कंपनीला दिले आहेत. मंगळवार 26 ऑक्टोबर दिवशी WHO च्या Technical Advisory Group सोबत झालेल्या बैठकीमध्ये कंपनीकडून कागदपत्र आल्यानंतर Final Risk Assessment घेण्यास तयार असल्याचं सांगण्यात आले आहे.

भारत बायोटेक कंपनीकडून कोवॅक्सिन बद्दलची आवश्यक कागदपत्र जागतिक आरोग्य संघटनेकडे या विकेंड पर्यंत सादर केली जाण्याची शक्यता आहे. Technical Advisory Group लसीच्या Final Risk Benefit Assessment साठी 3 नोव्हेंबरला भेटण्याची शक्यता आहे. नक्की वाचा: भारतात लहान मुलांना Covaxin देण्याबाबत DCGI ची अद्याप मंजुरी नाही; मूल्यमापन प्रक्रिया सुरू; MoS Health, Dr Bharati Pawar यांची माहिती .

जागतिक आरोग्य संघेटनेच्या मागणीनुसार, भारत बायोटेक कडून 27 सप्टेंबर दिवशीच काही कागदपत्रं सादर करण्यात आली होती. Technical Advisory Group for Emergency Use Listing (TAG-EUL)कडून जागतिक आरोग्य संघटनेला कोविड19 लसीला मान्यता देऊ शकतो का? याची शिफारस केली जाते.

कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन भारतीय लसींना देशात जानेवारी महिन्यात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार लसीकरण मोहिम देखील सुरू झाली. पुढे सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्डला WHO कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पण अद्याप कोवॅक्सिन प्रतिक्षेमध्ये आहे. आता कोविड संकट नियंत्रणात आले असताना आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेल्या लसींचे डोस घेतलेल्यांना अनेक देशांनी प्रवेश खुले केले आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनलाही ती मंजुरी मिळाल्यास अनेकांना परदेश वारी करण्यास हिरवा कंदील मिळणार आहे.