Coronavirus Vaccine: भारतात कोरोनावरील लस कधी उपलब्ध होणार? केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले 'हे' उत्तर
Union Health Minister Dr. Harsh Vardhan (Photo Credits: ANI)

Coronavirus Vaccine: भारतात कोरोना व्हायरसचे महासंकट अद्याप काही कमी झालेले नाही. त्यामुळे कोरोनावरील लस कधी येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर भारतीय बाजारात लस जो पर्यंत येत नाही तोपर्यंत कोरोना व्हायरसपासून सुटका होणारच नाही. भारतात कोरोना व्हायरसवरील लस याबद्दल प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे. याच दरम्यान, आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना वरील लस कधी येणार याबद्दल सांगितले आहे. भारतात कोरोना व्हायरसवरील लसीबद्दल असे म्हटले की, आम्ही पुढील 6-7 महिन्यादरम्यान 230 कोटी लोकांना लस देण्यास सक्षम असू.(COVID-19 Vaccine घेण्याबाबत 53% भारतीयांनी व्यक्त केली चिंता- सर्व्हे)

कोरोना व्हायरसच्या दरम्यान आज ग्रुप ऑफ मिनिस्टर्स यांची 22 वी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी असे म्हटले ही, भारताचा रिकव्हरी रेट हा जगात सर्वाधिक म्हणजेच 95.46 टक्के आहे. तर आपला मृत्यू दर जगात सर्वात कमी म्हणजेच 1.45 टक्के आहे. संपूर्ण भारतात 16 कोटीहून अधिक चाचण्या पार पडल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी पुढे असे ही म्हटले की, आम्हाला विश्वास आहे 2021 चे वर्ष सर्वांसाठी चांगले असणार आहे. कोविडच्या विरोधील लढाईत भारतातील नागरिकांन यश नक्कीच मिळेल.(Coronavirus Update: भारतात कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 1 कोटींचा टप्पा, तर मृतांचा एकूण आकडा 1,45,136 वर- आरोग्य मंत्रालय)

Tweet:

दरम्यान, जगातील 8 कोविड-19 लसींपैकी 3 लसी या विकासाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या लसींना  लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली कोविशिल्ड, भारत बायोटेकची Covaxin, Zydus Cadila विकसित ZyCoV-D, रशियाने विकसित केलेली Sputnik-V, SII ने विकसित केलेली NVX-CoV2373 आणि Geneva ने विकसित केलेली HGCO19 यांचा समावेश आहे.