Coronavirus Outbreak: कोरोना रुग्णांची संख्या 18,601 वर; आतापर्यंत 590 जणांचा मृत्यू, पहा आजची आकडेवारी
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची 21 एप्रिलची आकडेवारी काही वेळेपूर्वीच आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. यानुसार मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 1336 नवीन रुग्ण आणि 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 18,601 वर पोहचला आहे. यामध्ये 14759 सक्रिय रुग्ण 3252 बरे झालेले रुग्ण आणि 590 मृतांचा समावेश आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सर्वात मोठा प्रभाव हा महाराष्ट्रात दिसून येत आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात (Maharashtra) सुद्धा 466 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 666 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत.

केंद्र सरकारतर्फे काल कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या शहरांची नावे सांगण्यात आली, ज्यानुसार महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे ही दोन शहरे कोरोनाच्या टार्गेटवर आहेत हे दिसून आले आहे, मागील 24 तासात एकट्या मुंबईत कोरोनाचे 155 नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील रुग्णांची संख्या ही 3090  वर पोहचली आहे. ही आकडेवारीसंपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत अर्ध्याहुनही जास्त आहे, तसेच राज्यात आतापर्यंत 232 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दुसरीकडे दिल्लीला सुद्धा कोरोनाचा जबर फटका बसला आहे, दिल्लीत सद्य घडीला कोरोनाची 2,081 प्रकरणे असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे.(दिल्ली: COVID-19 बाधित पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले 16 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह) 

ANI ट्विट

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लोकांना लॉक डाउनच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जर का लोकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही तर आणखीन वाईट होतील अशी चिन्हे आता पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी काल २० एप्रिल पासून व्यवसाय आणी उद्योगांना काही देण्यात आली आहे,मात्र हॉटस्पॉट असणाऱ्या भागातील निर्बंध अद्यापही कायम आहेत.