Pizza Delivery Man | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही देशाची राजधानी असलेल्यी दिल्लीत हा आकडा 2000 च्या वर गेला आहे. याच दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या 72 कुटुंबात क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील 16 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचे दक्षिण दिल्ली जिल्हाधिकारी विभागाने सांगितले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या डिलिव्हरी बॉयवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

दिल्लीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यात 110 नव्या रुग्णांसह कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 2003 इतकी झाली आहे. तर 45 रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. दिल्ली मध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयला Coronavirus ची लागण; 72 कुटुंबातील सदस्य क्वारंटाईन

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,265 वर पोहोचली असून 2547 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 543 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर जगभरात एकूण 24,06,910 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 1,65,059 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तब्बल 72 घरात या संक्रमित डिलिव्हरी बॉयने पिझ्झा डिलिव्हर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ 72 कुटुंबातील सदस्यांनाही सेल्फ क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगितले होते. तसंच आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होते. मात्र पॅनिक न होता मास्कचा वापर करुन आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन डिलिव्हरी करण्याचे जिल्हा अधिकारी बी.एम. मिश्रा यांनी सांगितले आहे.