COVID-19 (Photo Credits: IANS)

भारत देशातील कोरोनाचा वेढा दिवसागणित अधिक मजबूत होत आहे. त्यातच दिल्ली (Delhi) मधील पिझ्झा डिलिव्हरी बॉयला (Pizza Delivery Boy) कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संसर्ग झालेल्या या डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या तब्बल 72 कुटुंबात क्वारंटीनमध्ये राहण्याचे साऊथ दिल्लीच्या (South Delhi) जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  कोरोनाची लागण झालेल्या डिलिव्हरी बॉयवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मालवीय नगर (Malviya Nagar) मधील प्रसिद्ध पिझ्झा कंपनीच्या डिलिव्हरी बॉय कोविड 19 पाझिटीव्ह आढळल्याने कंपनीतील त्याच्या 16 सहकार्यांना ताबडतोब क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याने पिझ्झा डिलिव्हर केलेल्या लोकांची घरे ट्रेस करण्यात आली.

तब्बल 72 घरात या संक्रमित डिलिव्हरी बॉयने पिझ्झा डिलिव्हर केल्याचे निर्दशास आल्यानंतर तात्काळ 72 कुटुंबातील सदस्यांनाही सेल्फ क्वारंटाईन मध्ये राहण्यास सांगितले आहे. तसंच आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पॅनिक न होता. मास्कचा वापर करुन आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन डिलिव्हरी करण्याचे जिल्हा अधिकारी बी.एम. मिश्रा यांनी सांगितले आहे. तसंच कोरोना पॉझिटीव्ह डिलिव्हर बॉयच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाईनमध्ये राहणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसंच त्याच्या 17 सहकाऱ्यांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या असून खबरदारी म्हणून संबंधित आऊटलेट तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.

ANI Tweet:

IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पिझ्झा आऊटलेटमधील काही ऑर्डर्स झॉमेटोच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. दिल्ली हे कोरोना विषाणूंचे हॉटस्पॉट आहे. 80% हून अधिक रुग्ण असलेल्या भागाला रेड झोन घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार दिल्ली रेड झोन मध्ये येत असून या घटनेनंतर धोका अधिकच वाढला आहे.

भारत देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,380 झाली असून त्यापैकी 1489 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोविड 19 च्या संसर्गाने आतापर्यंत तब्बल 414 रुग्णांचा बळी घेतला आहे.