Lockdown करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेण्यात आला, त्यावर पुनर्विचार व्हावा- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
Markandey Katju | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सींग (Social distance) हे हत्यात प्रभावी हत्यार असल्याचा निर्वाळा हा जागतिक आरोग्य संघटनेनेही दिला आहे. सोशल डिस्टंन्सीग पाळायचे तर लॉकडाऊन (Lockdown) करण्याला सध्या तरी कोणत्याही देशाला पर्याय नाही. त्यामुळे भारतातही केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू (Markandey Katju) यांना मात्र हा निर्णय फारसा पटला नाही. त्यामळे केंद्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला आहे. जनतेची माफी मागत सरकारने हा निर्णय त्वरीत दुरुस्त करावा आणि लॉकडाऊन मागे घ्यावा असे काटजू यांना वाटते. काटजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या थेट आणि वादग्रस्त मतांमूळे काटजू हे अनेकदा चर्चेत येतात. काटजू यांच्या विधानांमूळे सोशल मीडियावर अनेकदा त्यांना ट्रोल केल्याचेही पाहायला मिळते.

केंद्र सरकारच्या लॉकडाऊन निर्णयावर टीका करताना काटजू यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन शिवायही अनेक भारतीयांचा मृत्यू होऊ शकतो. पण, केवळ लॉकडाऊन करण्याच्या निर्णयामुळे भूकबळी जाऊन लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. काटजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन करण्याच्या निर्णयामुळे देशभरात 40 ते 45 कोटी लोकांवर अत्यंत वाईट दिवस आले आहेत. हे सर्व लोक असंघटीत क्षेत्रात काम करणारे आहेत. यात रोजंदारीने काम करणारे मजूर, स्थलांतरीत कामगार, छोटे उद्योजक अशा लोकांचा समावेश आहे. या लोकांकडे नोकरीची काहीच खात्री नाही. दररोजच्या जेवणासाठी या नागरिकांना दररोज कामावर जावे लागते.

मार्कंडेय काटजू ट्विट

काटजू यांनी पुढे म्हटले आहे की, 25 मार्चपासून देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, आता त्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. मला वाटते की, पंतप्रधानांनी कोणालाही न विचारता, तज्ज्ञ, अभ्यासकांना न विचारता लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. 24 एप्रिललला लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर केला. हा एक अत्यंत घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन संपविण्याबाबत अधिक विचार करायला हवा. (हेही वाचा, COVID 19 शी लढणार्‍या AIIMS च्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांसाठी CRPF ने दान केले 1 लाख सर्जिकल फेस मास्क)

Screenshot

काटजू ट्विट

मार्कंडेय काटजू यांनी पुढे म्हटले आहे की, जगभरात प्रतिवर्षी सुमारे 646000 नागरिकांचा मृत्यू फ्लूमुळे होते. म्हणजेच दररोज 2000 लोक किरकोळ आजार अथवा फ्लूने मृत्यू पावतात. यातील भारतात मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. इतकेच नव्हे तर 2016 मध्ये 20 कोटी पेक्षाही अधिक लोक मलेरिया आजार झाला. ज्यात 7 लाख लोकांचा मृत्यू झाला. लॉकडाऊन स्थिती आणखी काही दिवस राहिली तर, देशात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पालघरसारख्या घटनांची देशात पुनरावृत्ती होऊ शकते. देशाला अनेक कठीण संकटांचा सामना करावा लागू शकतो, असेही मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे.