भारतामधील सर्वात मोठी पॅरामिलिटरी फोर्स CRPF आता कोरोना व्हायरस विरूद्ध लढणार्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्यांसाठी पुढे सरसावली आहे. दरम्यान त्यांनी एम्स रूग्णालयातील कर्मचार्यांसाठी 1 लाख मास्क तयार केले आहेत. हे मास्क 3 लेयर सर्जिकल मास्क आहेत. दरम्यान दिल्लीमधील पॅरामिलिटरीच्या Family Welfare Association कडून या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. Coronavirus: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना.
सीआरपीएफ कडून सर्जिकल मास्क बनवण्यासाठी एक ऑटोमेटेड मशिन आहे. त्याच्याद्वारा हे मास्क बनवले जातात. सध्या कोरोनाचा लढा देण्यासाठी अवघी आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणेतील कर्मचार्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता सीआरपीएफची ही मदत महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान हे मास्क मोफत दिले जाणार आहेत.
ANI Tweet
Central Reserve Police Force (CRPF) donated 1 lakh 3-ply face surgical face masks for the healthcare workers of AIIMS, working in frontline for the management of COVID-19 patients. pic.twitter.com/kRliMh3SKy
— ANI (@ANI) April 22, 2020
भारतातील नक्षलग्रस्त भागामध्ये दहशतवादी कारवायांचा खात्मा करण्यासाठी प्रामुख्याने CRPF कडून काम केले जाते. त्यांचे जवान भारतभर तैनात असतात. सीआरपीएफनेही आमच्याकडून मास्कची मदत ही लढाईतील मदतीमध्ये खारीचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.