CRPF Jawan Killed In Hit And Run Incident: लातूरमध्ये हिट अँड रन घटनेत CRPF जवानाचा मृत्यू; अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल
गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावर (Latur-Nanded Highway) हा अपघात झाला. विशाखापट्टणम येथील रहिवासी लिंगुभेरू रवी (वय 41) यांना महामार्गावरील भातांगली आणि ममदापूर गावांदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जवान जागीच ठार झाला.
CRPF Jawan Killed In Hit And Run Incident: लातूर (Latur) जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 41 वर्षीय जवानाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावर (Latur-Nanded Highway) हा अपघात झाला. विशाखापट्टणम येथील रहिवासी लिंगुभेरू रवी (वय 41) यांना महामार्गावरील भातांगली आणि ममदापूर गावांदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जवान जागीच ठार झाला. यासंदर्भात मिड-डे या वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केलं आहे.
रवीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. मृत हा रजेवर घरी गेला होता. तो गुरुवारी कामावर परतत होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Cyber Fraud in Pune: अमेझॉनच्या नावे ऑनलाईन टास्क करण्याच्या नादात प्रोफेसरने गमावले 21 लाख; तपास सुरू)
देशभरात हिट अँड रनच्या अनेक घटना घडतात. 3 ऑक्टोबर रोजी ईशान्य दिल्लीतील खजुरी खास भागात सोमवारी रात्री एका ट्रकने एका मुलीला चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्रिया असे मृत महिलेचे नाव असून ती करावल नगर भागातील रहिवासी आहे. याप्रकरणी खजुरी खास पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, आज उत्तराखंडमध्ये अज्ञात कारच्या धडकेत बीएसएनएलचा सेवानिवृत्त कर्मचारी जखमी झाला. कुटुंबीयांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असता त्याचा तेथे मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश तिवारी (वय 66) हे बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला घराबाहेर पडले होते. रामपूर रोडवर भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. आसपासच्या लोकांकडून माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2023 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

