Coronavirus Lockdown: कर्जाच्या हफ्तांच्या वसुलीला 3 महिने स्थगिती देण्याचा RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा बॅंकांना सल्ला
File image of RBI Governor Shaktikanta Das | (Photo Credits: PTI)

जगातील इतर देशाप्रमाणे आता भारत देखील Covid 19 या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. परिणामी औद्योगिक जगत आणि सामान्यांना आगामी आर्थिक संकटाची झळ कमी बसावी म्हणून काही उपायात्मक योजना आज आरबीआय कडून जाहीर करण्यात आल्या आहे. आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांच्यामध्ये घट केल्याने कर्जाच्या हफ्त्यांमध्ये घट होणार आहे. तसेच पुढील 3 महिन्यांसाठी कर्जाच्या हफ्त्यांच्या वसुलीला 3 महिने स्थगिती देण्याचा सल्ला आरबीआयने सार्‍या बॅंकांना दिला आहे. याचा अर्थ ईआयम चुकल्यास पुढील तीन महिन्यांसाठी त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांकडून वसुल केला जाऊ शकत नाही. मात्र या तीन महिन्यांच्या काळानंतर पुन्हा ग्राहकांना हफ्ता भरावा लागणार आहे. त्यामुळे हे हफ्ते माफ केले नसून पुढील 3 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. कर्जावरील व्याजदर 5.14 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आणण्यासह RBI ने केल्या 'या' महत्वपूर्ण घोषणा

रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.90% ची कपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवा रिव्हर्स रेपो रेट 4 % इतका झाला आहे. त्यामुळे ग्राहकांचे गृह कर्ज, वाहन कर्ज प्रमाणेच इतर सार्‍या कर्जांचा हफ्ता कमी होणार आहे. सामान्यांच्या हातामध्ये यामुळे अधिक पैसे राहणार आहेत. दरम्यान काल (27 मार्च) भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब कल्याण योजना अंतर्गत जाहीर केलेल्या 1,70000 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजमध्ये समाजातील गोर गरीब ते संघटित आणि नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत

ANI Tweet

भारतामध्ये सध्या कोरोना बाधितांचा आकडा 724 पर्यंत पोहचला असून भारताची आर्थिक राजधानी मुंबईत शहरी भागातील सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत. 14 एप्रिल पर्यंत भारतामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने अनेक आर्थिक व्यवहार, व्यापार, लहान मोठे उद्योगधंदे सध्या ठप्प आहेत. त्याचा आर्थिक फटका देशाला बसणार आहे. येत्या काळात जगात मोठी आर्थिक मंदी आणि महागाई अशी दोन संकट उभी ठाकण्याचा धोका देखील आज शक्तिकांत दास यांनी बोलून दाखवला आहे.