Shaktikanta Das (Photo Credits: ANI)

देशावर आलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) या महाभयाण संकटावर लढण्यासाठी RBI गर्व्हनर ने आज खूप महत्त्वाची घोषणा केली आहे. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदर 5.14 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. तसेच पुढील 3 महिन्यांसाठी सर्व कर्जांचे हफ्ते पुढील 3 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते भरणा-यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मात्र त्याचबरोबर कोरोना मुळे आता GDP चे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक झाले असल्याचे RBI गर्व्हनर शक्तिकांत दास (Shaktikanta Das)यांनी सांगितले आहे.

कोरोना व्हायरसच्या महाभयाण संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा पुढे सरसावल्या असून देशवासियांनी दिलासादायक अशा महत्वाच्या घोषणा RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केल्या आहेत.

शक्तिकांत दास यांनी केलेल्या महत्वपूर्ण घोषणा:

- अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदर 5.14 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर

- व्याजदर कमी झाल्याने कर्जाच्या हफ्त्याची रक्कम कमी होणार

- RBI कडून रेपो रेट 75 बेसिस पॉईंट्सने कमी

- CRR मध्ये 1% ची कपात

- होम,कार लोनचा EMI कमी होणार

- सरकारी बँकांचा व्याजदर घटणार

- 1 लाख कोटी रुपये बाजारात आणणार

- सर्व कर्जाचे हफ्ते 3 महिने स्थगित

- खासगी बँकांमध्ये खाते असलेल्या खातेदारांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे खाते सुरक्षित असेल.

- अन्नधान्यांवरील महागाई कमी होण्याची शक्यता

हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार: नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिल्या सुचना

या सर्व दिलासादायक घोषणांसोबत RBI कडून भविष्यातील चिंताजनक शक्यताही वर्तविण्यात आल्या आहेत.

- GDP चे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक

- Coronavirus मुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता

- अनेक क्षेत्रांना कोरोनाचा आर्थिक फटका

- कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम

- जगभरात मंदी येण्याची शक्यता

नागरिकांसाठी व्याजदर कमी करण्यात आल्याने याचा फटका बँकांना बसू शकतो. म्हणून बाजारात आजच 25,000 कोटी दाखल होणार आहे. ही रक्कम सर्व बँकांमध्ये देण्यात विभागण्यात येणार असून ज्यामुळे बँकांवरही अतिरिक्त भार होणार नाही आणि व्यापारांना तसेच जनतेला देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी रक्कम असेल. थोडक्यात RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्याकडून करण्यात आलेल्या घोषणा या नक्कीच दिलासादायक असल्या तरीही भविष्यातील त्यांनी निर्माण केलेली चिंतेकडे दुर्लक्ष करुन देखील चालणार नाही.