चीन (China) मधील वुहान शहरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) दिवसेंदिवस अन्य देशांत सुद्धा झपाट्याने पसरत चालला आहे. तर आता पर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा 41 वर पोहचला आहे. या व्हायरसचे परिणाम भारतात सुद्धा दिसून येत आहेत. याच पार्श्वभुमीवर केरळ (Kerala) येथे चीन मधून आलेले 7 जणांचा याची लागण झाल्याची लक्षणे दिसून आली नाही आहेत. तरीही त्यांनच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्यास सांगितले असून राज्यात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरची आता पर्यंत 1287 प्रकरणे समोर आली आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला असून चीन मधील आरोग्य विभागाने अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. असे सांगितले जात आहे की, भारतातील 96 विमानांमधील 20 हजार 844 पेक्षा अधिक प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी मधून अद्याप कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली नाहीत.(Coronavirus च्या पार्श्वभुमीवर लखनौ, मुंबई येथील विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित)
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.