Coronavirus च्या पार्श्वभुमीवर लखनौ, मुंबई येथील विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित
Coronavirus

चीन मधील वुहान शहरातील लोकांना कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे आतापर्यंत 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर लखनौ येथे रुग्णालयात या व्हारसचा उपचार व्हावा यासाठी वेगळे वॉर्ड बनवण्यात आले आहेत. तसेच कोरोनाचा एक जरी रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात यावी असे निर्देशन देण्यात आले आहेत. एवढेच नाही लखनौसह मुंबईतील विमानतळावर थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

वुहान शहरात 62 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी भारतामधील एक शिक्षिका चीन मधील कोरोनाच्या संपर्कात आली. याची माहिती मिळताच तातडीने केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीति सूदन यांनी अलर्ट जाहीर केला. चीन येथून येणाऱ्या प्रवाशांची पूर्णपणे तपासणी करण्यात यावी असे निर्देशन आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.(Coronavirus ची लागण चीन पाठोपाठ जपान आणि अमेरिका पर्यंत पोहचली; जाणून या आजारा विषयी खास माहिती)

Twitter:

कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.