Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

देशात वाढत असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा फैलाव नागरिक अनुभवत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) लेटेस्ट अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 53 लाखांवर पोहचला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 53,08,015 इतकी झाली असून त्यापैकी 10,13,964 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) आहेत. तर 42,08,432 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना संसर्गामुळे एकूण 85,619 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून जगात भारत प्रथमस्थानी आहे. कोरोना रिकव्हरीच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जगातील एकूण रिकव्हरीत भारताचे 19% योगदान आहे. तर भारतात एकूण 79.28% रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारतात मागील 24 तासांत 93,337 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,247 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, 24 तासांत 95880 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात 16 सप्टेंबर रोजी 80,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. आतापर्यंत देशात तब्बल 42 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यू दरातही घट होत आहे. सध्याच्या मृत्यू दर 1.61% इतका आहे.

Ministry of Health Tweet:

देशातील 5 राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असला तरी रिकव्हर होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे.. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आतापर्यंत 60% रुग्ण रिकव्हर झाले आहेत. रिकव्हरी रेटमध्ये महाराष्ट्र 22,000 (23%) , आंध्र प्रदेश 11,000 (12.3%) इतके योगदान आहे. (कोविड19 वरील लसची चाचणी दुसऱ्या टप्प्यात, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता- एम्स कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट प्रमुख डॉ. संजय राय)

दरम्यान, कोविड-19 वर लस किंवा औषध उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे.