COVID-19 Vaccine Update: कोविड19 वरील लसची चाचणी दुसऱ्या टप्प्यात, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता- एम्स कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट प्रमुख डॉ. संजय राय
डॉ. संजय राय (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घालत असल्याने सर्वजण त्यामुळे त्रस्त झाले आहेत. प्रत्येक देशातील मोठे डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांकडून कोरोनावरील लसीचा शोध घेण्यासाठी दिवस रात्र काम करण्यासह त्याच्या चाचण्या करत आहेत. परंतु अद्याप कोणत्याच देशाला यावरील ठोस औषध मिळालेले नाही. याच दरम्यान आता कोरोनाच्या लसीसंबंधित एम्सचे (AIIMS) कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. संजय राय (Dr. Sanjay Rai) यांनी एक विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, एम्स मध्ये कोरोनाच्या लसी संदर्भातील चाचणी दुसऱ्या टप्प्यात सुरु करण्यात आल्याची माहिती दिली आहे.(COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Serum Institute ला Oxford-AstraZeneca च्या लसीच्या पुन्हा मानवी चाचणी सुरू करायला DCGI कडून परवानगी)

मीडियासोबत बातचीत करताना डॉ. संजय राय यांनी असे म्हटले आहे की, भारतात कोरोनाच्या लसीची दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे. 600 हून अधिक वॉलेंटिअर्सवर याची चाचणी केली जात आहे. जर सर्व काही योजनाबद्ध जरी सुरळीत चालले तरीही जगात कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होऊ शकते. यापूर्वी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात याआधीच स्वदेशी पद्धतीची डोस 'कोवेक्सिन' ची व्यक्तींवर क्लिनिकल ट्रायलची पहिली चाचणी पार पडली आहे.(Coronavirus in India Updates: देशातील 60% सक्रीय रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये; 13 राज्यांमध्ये कोविड-19 च्या 5000 हून कमी Active Cases)

दरम्यान, दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनावरील लसीची दुसरी चाचणी सुरु होणार आहे. असे ही म्हटले जात आहे की, ,सीरम इंस्टीट्युट मध्ये कोरोना व्हायरसच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात सुरु आहे. ICMR चे महानिर्देशक बलराम भार्गव यांनी तीन दिवसांपूर्वी मीडियाला माहिती देत असे म्हटले होते की, सीरम इंस्टीट्युट कोविड19 लसची दुसरी चाचणी पार पडली आहे. तिसरी चाचणी सुरु होणार आहे.