देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसागणित वाढणारी कोरोना बाधितांची मोठी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. परंतु, सुमारे 60% सक्रीय रुग्ण (Active Cases) हे 5 सर्वाधिक प्रभावित राज्यांत आहेत. तर 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 हून कमी सक्रीय रुग्ण आहे. यात पॉडेंचेरी, मध्य प्रदेश. छत्तीसगढ, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नॉगालँड, लडाख, मिझोरम, सिक्कीम, दादरा नगर हवेली, अंदमान-निकोबार आणि लक्ष्यद्वीप यांचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.
कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून त्या पाठोपाठ कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. दरम्यान देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. तर मृत्यू दरात घट होत आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे दिवसागणित वाढणारा आकडा मोठा आहे. (कोविड 19 विरूद्ध लस 2021 च्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध होऊ शकते; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राज्यसभेत माहिती)
ANI Tweet:
Around 60% of the active cases are concentrated in only 5 most affected states. There are 13 states and UTs that even today have less than 5000 active Cases: Ministry of Health & Family Welfare. #COVID19 pic.twitter.com/Pnik8OOkpi
— ANI (@ANI) September 18, 2020
कोविड-19 वर अद्याप लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने ट्रस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या आधारावर कोरोना संसर्गाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या 6,15,72,343 सॅपल टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 10,06,615 नमुने काल तपासण्यात आले आहेत, अशी माहिती ICMR ने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 52,14,678 वर पोहचला असून त्यापैकी 10,17,754 सक्रीय रुग्ण आहेत. तर 41,12,552 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दरम्यान, 84,372 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. मागील 24 तासांत यात 96,424 रुग्णांची मोठी भर पडली असून 1,174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.