Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट निवारणासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज तयार केले आहे. या पॅकेजमधील बरीचशी रक्कम लॉकडाऊन काळातील भरपाई म्हणून दिली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 5,125 कोटी रुपयांची रक्कम एप्रिल ते जुलै या कालावधीत 4 महिन्यांच्या हप्ता रुपात जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरना व्हायरस पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 2,000 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा काही दिवासंपूर्वीच एका पत्रकार परिषदेत केली होती. देशातील सुमारे 9.07 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचेही सीतारमण यांनी म्हटले होते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 हजार रुपयांची रक्कमक तीन टप्प्यांमध्ये देण्यात येते. हे तीन टप्पे प्रत्येक चार महिन्यांनी एक अशा प्रमाणात येतात. प्रत्येक टप्प्यात 2,000 हजार असे एकूण चार टप्प्यांत ही रक्कम (6 हजार रुपये) शेतकऱ्यांना मिळते. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनंतर या वेळचा हप्ता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. नेहमीच्या पद्धतीने ही रक्कम एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार होती. 26 मार्च या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे संपूर्ण देशावर परिणाम होत असल्याचे सांगत. गरिबांच्या मदतीसाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. (हेही वाचा, Coronavirus: मोदी सरकारच्या कोरोना व्हायरस पॅकेजवर नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बनर्जी काय म्हणाले?)

फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकार 4 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसै देत असली तरी, एकूण योजनेचा 58,300 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार केंद्राच्या तीजोरीवर पडतो. सुरुवातीला ही योजना शेतकऱ्यांना केवळ छोट्या शेतकऱ्यांसाठी होती. मात्र, पुढे अल्पावधीतच तिचा विस्तार करुन ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली.