Coronavirus मुळे 'या' क्षेत्राला सर्वात मोठा फटका; जगभरातील 5 कोटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा?
Coronavirus | photo used for representation Purpose |(Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे भारतासह जगभरात एकच हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत चीन, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, स्पेन, सहित अनेक देशातून हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, 1 लाखाहून अधिकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना पासून वाचण्यासाठी लोकांनी प्रवास करू नये, लोकांना भेटणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी फार जाऊ नये अशा नाना प्रकारची नियमावली जारी करण्यात आली आहे. साहजिकच यामुळे अनेक व्यवसायांवर प्रभाव पडला आहे. Bloomberg.com या वेबसाईटच्या माहितीनुसार जगभरातील 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या या व्हायरसमुळे धोक्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायावर परिणाकोरोम होऊन 10 कोटींचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे दिवसागणिक शेअर बाजारात (Share Market)  घसरण होत आहे, सोने, चांदी, पेट्रोल यांचे भाव देखील सतत बदलत आहेत. मात्र या सर्वात टुरिझम (Tourism) हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित असल्याचे समजत आहे.

(हे ही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसचे चीन, इटली, इराण, अमेरिकामध्ये थैमान; मृतांची आकडेवारी जाणून बसेल धक्का )

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउंसिल (WTTC) च्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे शेकडो विमानानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे, भारत सुद्धा एअर इंडिया, इंडिगो सहित कंपन्यांनी काही देशांसाठी आपल्या विमानफेऱ्या स्थगित केल्या आहेत. अनेक जलवाहतुकीच्या क्रूझ सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वे, बस सेवा सीमा भागात अगदी कमीत कमी ठेवण्यात आल्या आहेत. या मुळे साहजिकच प्रवाशांची संख्या आणि परिणामी उत्पन्न घटले आहे. पर्यटनावर आधारित छोट्या व्यवसायांच्या बाबतही अशीच परिस्थिती दिसून येतेय. यात भर म्हणजे ज्या प्रवाशांना यामुळे आपला प्रवास रद्द करावा लागला त्या सर्व प्रवाशांना कंपन्यांकडून तिकिटाचे पैसे परत द्यावे लागणार आहेत. यामुळे कंपन्यांची आर्थिक समीकरणे कोलमडणार असून याचा फटका नोकरदार वर्गाला बसू शकतो.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत भारतात 115 जणांना लागण झाली आहे. तर यापैकी सर्वात जास्त आकडा हा महाराष्ट्रात आहे. खबरदारी म्हणून आता अनेक राज्यात शाळा- कॉलेज तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तूर्तास जरी हा आजार हटवणे हे सर्व राष्ट्रांचे ध्येय असेल तरी त्यांनतर घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुर्वव्रत करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.