
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात थैमान घातला आहे. सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर 70 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे संसर्ग पसरले आहे. यात भारताचाही समावेश आहे. आतापर्यंत संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकलेल्या 6 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 70 हजारांवर जाऊन पोहचली आहे. मृतांच्या आकडेवारीत चीननंतर इटलीचा क्रमांक लागत आहे. कोरोनामुळे इटलीमध्ये गेल्या 24 तासात 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना व्हायरसचे संकटावर कशी मात करायची, असाही प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
कोरोना व्हायरस संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या मृतांच्या आकडेवारीत घट झाल्याचे समजत आहे. यामुळे कोरोना व्हायरचे प्रमाण लवकरच कमी होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, इटली कोरोना व्हायरसशी झुंज देत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यानंतर इराण, अमेरीका, भारतासह अनेक देशांत कोरोना व्हायरचे रुग्ण आढळू लागले आहे. सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे. हे देखील वाचा- Covid-19: आनंदाची बातमी! चीनमध्ये Coronavirus संक्रमण होण्याचे प्रमाण घटले
इटलीमधील मृतांची आकडेवारी-
इटलीमध्ये आतापर्यंत 1 हजार 9 लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 24 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, यांपैकी 2 हजार 335 लोक बरेही झाले असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक म्हणजे, इटली देशात गेल्या 24 तासांत 368 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इटलीमध्ये पार्कमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इतर निर्बंधही लावण्यात आल्याचे कळते आहे.
इराणमधील मृतांची आकेडवारी-
इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. इटली मध्ये करोनामुळे 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 14 हजार लोक संक्रमित आहेत. कोरोनाच्या भितीमुळे नागरिकांना घराबाहेर टाळणे बंद केले आहे. कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आले आहेत. येथे दोन वेळा वेगवेगळ्या कारागृहांमधून हजारो कैद्यांना सोडून देण्यात आले आहे.
स्पेनमध्ये 24 तासांमध्ये 96 तर, फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू-
स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोनामुळे मत्यूतांडव सुरूच आहे. स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 96 तर फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये 292 तर फ्रान्समध्ये 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 7800 हून अधिक कोरोना बाधित आहेत. तर फ्रान्समध्ये 5400 पेक्षा अधिक लोक कोरोना बाधित आहेत. दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान यांच्या पत्नीदेखील कोरोनाबाधित आहेत.
अमेरिकेतही कोरोनाचे थैमान-
संपूर्ण देशांमध्ये सुरक्षित मानला जाणारा देश अमेरिकाही कोरोनाच्या जाळ्यात अडकला आहे. सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी असली तरीदेखील कोरोना प्रतिबंधक लसचा शोध न लागल्याने अमेरिकालाही याचा मोठा सामना करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत अमेरिकेत गेल्या 24 तासात 11 जणांता मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाबाधित लोकांना बाधा झाली आहे. यामुळे अमेरिकेत एकूण 68 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3714 वर गेली आहे.
भारतातही कोरोनाबाधित लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या भारतात कोरोनामुळे 2 दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, 70 हून अधिक नागिरिकांना कोरोनाचे संक्रमित झाले आहे. वरील आकडेवारी एबीपी माझाने आपल्या वृत्तात दिली आहे.