कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. ही चिंता कमी करायला लावणारी बातमी आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बातमी कोरोना व्हायरसचे मुळ असलेल्या चीनमधूनच आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या हवाल्याने स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, चीनमध्ये कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. मात्र, Covid-19 (कोरोना व्हायरस) संक्रमीत नव्या रुग्णांची सख्या घटली आहे. त्यामुळे हे प्रमाण हळूहळू कमी येईल.
पीपल्स डेलीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत म्हटले आहे की, चीनमध्ये सीओव्हीआयडी-19 विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागानेही याला दुजोरा दिला आहे. पीपल्स डेली हे चीनचे सरकारी वृत्तपत्र आहे.
दरम्यान, जगभरात आतापर्यंत सुमारे 1,21,500 हजार नागरिकांना कोरोना व्हायरस बाधा झाल्याचा आकडा आहे. आतापर्यंत जगभरातील 144 देशांमध्ये या विषाणूची लागण झाल्याचे रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस म्हणजे एक मोठ्या प्रमाणावर पसरणारा साथीचा रोग असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत जगभरात सुमारे 4,300 नागरिकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच तब्बल 3,000 नागरिकांचा बळी गेला आहे. (हेही वाचा, मुंबई: मुलुंड येथे कोरोना व्हायरस संक्रमीत एकही रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नये: आमदार मिहिर कोटेचा)
पिपल्स डेली चायना ट्विट
The peak period of #COVID19 outbreak in China has passed as the number of new cases is declining and the epidemic remains in check, according to the National Health Commission. pic.twitter.com/XKDEaIe9jC
— People's Daily, China (@PDChina) March 12, 2020
जगभरातील संशोधक कोरोना व्हायरस नियंत्रणात आणेन किंवा त्यावर प्रतिबंधित ठरेन अशी लस शोधत आहेत. आतापर्यंत तरी या संशोधनास यश आले नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील विविध देशांमधील संशोधक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ कोरोना व्हायरस नियंत्रित करण्यासाठी उपाय शोधत आहेत.