भारतामध्ये कोरोना संकट नियंत्रणामध्ये असल्याचं चित्रं आहे पण तरीही भविष्यातील धोका टाळण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. यामध्ये आता भारतात 12-14 वयोगटातील मुलांना देखील कोविड 19 लस दिली जाणार आहे. सोमवार (14 मार्च) दिवशी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी माहिती दिली आहे. 16 मार्चपासून या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान 12-14 वयोगटातील मुलांना केवळ Corbevax ही लस दिली जाणार आहे. मग जाणून घ्या या लसीचं काय आहे वैशिष्ट्यं?
Union Health Secretary Rajesh Bhushan यांनी एक पत्र जारी करत सार्या राज्यांना 12 ते 14 वयोगटातील मुलांवर केवळ Corbevax ही लस देण्याचं आवाहन केले आहे. हे देखील नक्की वाचा: Corbevax कोविड 19 लस 5-12 वयोगटातील मुलांना देण्याकरिता आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी Biological E कडून अर्ज; सूत्रांची माहिती .
#COVID19 vaccination of children in the age group of 12-14 years to be started from 16th March 2022. Only Corbevax vaccine would be used for the beneficiaries of age group 12-13 and 13-14 years: Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Chief Secretaries of all states pic.twitter.com/PBVRjD2AH2
— ANI (@ANI) March 15, 2022
Corbevax लसीचं वैशिष्ट्यं
- Corbevax ही कोविड 19 लस हैदराबादच्या Biological E कंपनीने विकसित केलेली आहे. अमेरिकेतील टेक्सास मधील Children’s Hospital Centre for Vaccine Development आणि Baylor College of Medicineयांच्यासोबत विकसित झालेली ही भारताची पहिली indigenously developed protein subunit vaccine आहे.
- “recombinant protein subunit vaccine" असं बिरूद मिरवणारी ही लस हिपॅटायटीस शॉट प्रमाणेच ट्राईड आणि टेस्टेड आहे. याचा अर्थ mRNA (Pfizer-BioNTech, Moderna) आणि नॉन-रिप्लीकेटिंग व्हायरल व्हेक्टर (Covishield, Sputnik V) लसींपेक्षा वेगळी आहे. त्यालसी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या वापरल्या गेल्या. कारण कोविड 19 जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता.
- ह्युमन ट्रायल्सच्या फेझ 3 मध्ये Corbevax ही लस कोविशिल्डच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटच्या विरूद्धही अधिक चांगला इम्यू रिस्पॉन्स निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. असा Biological E चा दावा आहे.
- लसीचा प्रभाव मूळ कोरोना वायरसवर 90% आहे तर डेल्टा व्हेरिएंट वर (लक्षणांसह) 80% प्रभाव आहे. सध्या ओमिक्रॉन वरील प्रभावाचा अभ्यास सुरू आहे.
- Corbevax एक रीकॉम्बीनंट प्रोटीन प्लॅटफॉर्म वापरते जे सध्या देशात वितरित केल्या जात असलेल्या इतर कोणत्याही लसीद्वारे वापरले जात नाही. इतर लसींप्रमाणे, कॉर्बेव्हॅक्स स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करते. त्यामुळे पेशींना त्यांची प्रतिकृती बनवण्याची सूचना देण्याऐवजी, लस प्रयोगशाळेत क्लोन स्पाईक प्रोटीन लहान प्रमाणात इंजेक्ट करते. यामुळे आजार गंभीर होण्याचा धोका कमी होतो.
Biological E च्या दाव्यानुसार त्यांची लस माफक दरात उपलब्ध आहे. त्यामुळे अल्प आणि मिडल इन्कम असलेल्या देशातही ती वापरली जाऊ शकते. ही लस त्यांच्या आवाक्यातील आहे. भारतातही सअर्वात स्वस्त लस हीच असू शकते. अन्य लसींप्रमाणेच या लसीचे देखील 2 डोस घ्यावे लागणार आहेत. 400 रूपयांपेक्षाही कमी दरात ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.