Conjoined Twins Register as Voters: काही दिवसांपूर्वीच जुळे भाऊ सोहना आणि मोहना यांनी आपला 18 वा वाढदिवस साजरा केला आहे. आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मतदानाच्या अधिकाराचा दावा केला आहे. अमृतसर प्रशासनासह स्वत: मतदार म्हणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर दोघांना आगामी 2022 च्या विधानसभा निवडणूकीत पहिल्यांच मतदान करता येणार आहे. त्यांनी असे म्हटले की, आम्ही आता अधिकृतरित्या मोठे झालो आहोत. आता आम्ही आमच्या पसंदीच्या उमेदवाराला मत देणार आहोत. तसेच त्यांनी मतदान करण्यासाठी वेगळा फॉर्म-6 साठी अर्ज केला होता. मात्र आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, त्यांना वेगळ्या दोन व्यक्ती की एकच व्यक्ति म्हणून मान्यता दिली जाणार.
त्यांना आता गुप्त मानदंडाचे पालन करावे लागणार आहे. जर एखादा मत देत असेल तर त्यावेळी अन्य कोणालाही तेथे उपस्थितीत राहण्याची परवानगी नसते. डीसी गुरप्रीत सिंह खैरा यांनी म्हटले की, या दोघांचे एक वेगळेच प्रकरण आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या गाइडलाइन्स पहाव्या लागणार आहेत. त्यांची नावाचे मतदान कार्ड हे एकच किंवा वेगवेगळे करावे लागणार हे सुद्धा बघावे लागणार आहे. आम्हाला निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत त्यांना एकच किंवा दोन रुपात मतदान करता येईल का हे सुद्धा पहावे लागणार आहे.(दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग, कोणहीती जीवितहानी झाली नसल्याची माहिती)
पिंगलवाडाचे प्रमुख इंद्रजीत कौर यांनी असे म्हटले की, सोहना आणि मोहना दोघे हे डोक्याच्या भागाने वेगळे आहेत. त्यांची मत सुद्धा वेगळी आहेत. सध्या ते आयटीआय मधून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्याबद्दल टेक्निकलचा अभ्यास करत आहेत.
दरम्यान, 14 जून 2003 रोजी नवी दिल्लीतील सुचेता कृपलानी रुग्णालयात सोहना आणि मोहना यांचा जन्म झाला होता. डॉक्टरांनी त्यांना एकमेकांपासून वेगळे न करण्याचा निर्णय घेतला. कारण यामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती. त्यांचे शरीर फक्त धडाच्या खालून एकमेकांना चिकटले गेले आहे. या दोघांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिले. पण त्यांच्या जन्माच्या दोन महिन्यांनी त्यांना पिंगलवाडा सोसायटीने दत्तक घेतले.