EIA 2020 मसूदा मागे घेऊन केंद्र सरकारने देशाची लूट थांबवावी- राहुल गांधी
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष, वायनाड येथील खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर टीका करत पर्यावरण प्रभाव मूल्यांकन 2020 ( Environment Impact Assessment 2020) कायद्याचा मसूदा मागे घ्यावा असे म्हटले आहे. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन मसूदा (EIA 2020) म्हणजे देशातील संपत्तीची सरळ सरळ लूट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तो मागे घ्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, EIA 2020 मसूदा म्हणजे भाजप सरकार देशातील संपत्ती कशा प्रकारे लूटत आहे याचा उत्तम नमुना आहे. देशभरातील मुठभर लोकांसाठी हे सूटा-बुटातील सरकार काय काय करते हेच या मसूद्यातून दिसते. देशातील लूट आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचा असेल तर केंद्र सरकारने आयईए-2020 मसूदा मागे घेतला पाहिजे.

राहुल गांधी यांनी आधी कालही (रविवार, 10 ऑगस्ट 2020) नागरिकांना अवाहन केले होते की, नव्या EIA 2020 मसूद्याबाबत जनतेने विरोध करायला पाहिजे. कारण, हा मसूदा देश आणि देशाती साधनसंपत्तीसाठी अत्यंत हानीकारक आहे. ज्यामुळे देशाची अपरिमित हानी होणार आहे. याचा होणारा परिणाम हा दीर्घकालीन आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: 'आता खूप उशीर झालाय', काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधी यांच्यासमोर खदखद व्यक्त)

दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या वर्षी मार्च महिन्यात इआयए मसुद्याबाबत अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेवर जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांसाठी पर्यावरणविषयक मंजूरी देण्याची प्रकरणे येतात.