Agriculture Laws 2020: राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा म्हणाले 'भारतातील लोकशाही मेली आहे, हा घ्या पुरावा'
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

संसदेत मंजूरी मिळालेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांची स्वाक्षरी झाली आणि त्याचे कायद्यात (Agriculture Laws 2020 ) रुपांतर झाले. परंतू, या विधेयकास सुरु झालेल्या संसदेतील विरोध आता देशभरात रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आक्रमक झाले असतानाच काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्राचे कृषी कायदे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावली आहे. त्याचा हा धडधडीत पूरावा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने लोकसभेमध्ये बहुमताच्या जोरावर आणि राज्यसभेमध्ये अवाजी मतदानाद्वारे ही तिन्ही विधेयके मंजूर करुन घेतली. राज्यसभेत या विधेयकावेळी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नव्हते असा विरोधकांचा आक्षेप होता. त्यातच ही विधेयक मतदानाला न टाकता अवाजी मतदानाने पारीत करण्यात आली. यावेळी राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या गदारोळातच ही विधेयके पारीत झाली. दरम्यान, विरोधक जागेवर बसले नव्हते असा दावा उपसभापतींनी केला होता. उपसभापतींचा हा दावा खोडू काढत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी 'भारताली लोकशाही मृतप्राय झाली आहे. हा घ्या त्याचा पुरवा असे म्हटले आहे'. (हेही वाचा, Farm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम)

राहुल गांधी यांचे ट्विट

राहुल गांधी यांनी एका वृत्त शेअर करत ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'केंद्र सरकारचे शेती कायदे हे शेतकऱ्यांसाठी फाशीच्या शिक्षेसारखे आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातो आहे. भारती लोकशाही मृतप्राय झाली आहे. त्याचाच हा पुरावा आहे. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे'.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभर विरोध होत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमध्ये तीव्र आंदोलन पाहायला मिळत आहे. आजही दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरु असून, इंडिया गेट परिसरात आंदोलकांनी एक ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला.