Farm Bills वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, कृषी विधेयक महाराष्ट्रात लागु न करण्याच्या निर्णयावर महाविकासआघाडी ठाम
Maharashtra About Farm Bills | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांवर (Farm Bills) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी स्वाक्षरी करुन मान्यता दिली आहे. या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र दुसरीकडे ही विधेयकं शेतकर्‍यांंच्या हिताची नसल्याचे म्हणत अजुनही देशभर त्यास विरोध होत आहे. यावरुनच भाजपाचा (BJP) मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (Akali Dal)  याने NDA मधुन आपला सहभाग देखील काढुन घेतला आहे. महाराष्ट्रात सुद्धा या विधेयकांप्रति विरोधी भावना आहेत, महाविकासआघाडी सरकार हे या विधेयकांंच्या विरोधात असुन आपण हा कायदा राज्यात लागुच होऊ देणार नाही अशी घोषणा महाराष्ट्र राज्य महसुल मंंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांंनी केली आहे.

थोरात यांंनी काही वेळापुर्वी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, संसदेत मंंजुरी मिळालेले विधेयकंं हे शेतकरी विरोधी आहे.त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्या विरोधात आहोत. महाविकास आघाडी संपुर्णतः या विधेयकाच्या विरोधात आहे, हे विधेयकं महाराष्ट्रात लागु होऊ देणार नाही शिवसेना सुद्धा आमच्या सोबत आहेत, यासाठी एक कमिटी स्थापन करुन पुढील कामाची आखणी केली जाईल. Farm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या

ANI ट्विट

दरम्यान, आज मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांंच्यात वर्षा बंंगल्यावर दुपारी बैठक पार पडली होती यावेळी हा मुद्दा चर्चिला गेला असल्याची शक्यता आहे.या संदर्भात चर्चेसाठी उद्या कॉंग्रेसचे शिष्टमंंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांंची सुद्धा भेट घेणार असल्याचे थोरात यांंनी सांंगितले आहे.