राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi), केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह देशभरातील इतरही अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंवर पाळत ठेवल्याचे केल्याचे वृत्त कालच पुढे आले होते. परंतू, हे प्रकरण इतक्यावरच थांबणारे दिसत नाही. आता भारतातील आरोपींवरही पाळत ठेवली जात असल्याचे आणखी एक वृत्त पुढे आले आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार ऑगस्टा-वेस्टलॅण्ड लाचखोरी प्रकरणातील आरोपी, आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद, संघटित गुन्हे, अंमली पदार्थाची तस्करी करणारे ते भ्रमणध्वनी चोरणारे अल्पवयीन चोर यांच्यापर्यंत ही पाळत ठेवली जात आहे. ‘झेनुआ डाटा’ (Zhenhua) ही चीन कंपनी हे काम करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
झेनुआज ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डाटाबेसमध्ये (ओकेआयडीबी) करचुकवेगिरी केलेल्या काही प्रकरणांचा समावेश आहे. या डेटाबेसमध्ये रामलिंग राजू ( सत्यम समूह अध्यक्ष) यांचे नातेवाईक आणि त्यांच्या मित्रपरीवाराने स्थापन केलेल्या सुमारे 19 कंपन्यांचा समावेश आहे. चारा घोटाळा प्रकरणात अडकलेले झारखंडचे काही अधिकारी आणि पुरवठादार. मध्य प्रदेशात गाजलेला आणि व्यावसायिक परीक्षा मंडळाचा सहभाग दिसून आलेला बहुचर्चीत व्यापम घोटाळा यांसारख्या अनेक बड्या प्रकरणांचा या डेटाबेसमध्ये समावेश आहे, असेही एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरु असलेली चौकशी, कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, झारखंडचे मुख्यमंत्री मधू कोडा आदी मंडळींनी केलेल मनीलॉण्डरिंग यांसारख्या प्रकरणांचाही समावेश या डेटाबेसमध्ये पाहायला मिळतो. (हेही वाचा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चीन ठेवतय पाळत, करतंय हेरगिरी- रिपोर्ट)
भारतामध्ये वेळोवेळी उघडकीस आलेल्या आर्थिक गुन्ह्यांचा, भ्रष्टाचार प्रकरणांचा तसे मनीलॉण्डरिंग प्रकरणे आणि इतरही काही गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश या डेटाबेसमध्ये पाहायला मिळतो. अगदी फसवणूक आणि लाचखोरी आदी प्रकरणेही यात पाहायला मिळतात. याशिवाय विविध प्रकणांमध्ये सेबीने निर्बंध घातलेल्या सुमारे 500 पेक्षाही अधिकी व्यक्तींचा समावेश या डेटाबेसमध्ये आहे.
पाळत ठेवण्याचा हा सिलसिला इतक्यातच थांबत नाही. तर, भारताली बॉम्बस्फोटातील आणि इतर कारवायांमध्ये आरोपी अथवा नावे असलेल्या 100 पेक्षाही अधिक दहशतवाद्यांचीह नावे या डेटाबेसमध्ये आहेत. यात कुख्यत डॉन दाऊद इब्राहीम, टायगर मेमन, वर्धमान बॉम्बस्फोटातील जेएमबीचे दहशतवादी यांचाही समावेश आहे. तसेच, काही अमली पदार्थ, सोने, वन्यजीव यांच्या तस्करीबाबत काम करणारे लोक आणि इतर काही प्रकरणांचा समावेश आहे.