Covid-19 Vaccine Update: Biological-E ची लस लवकरच येणार; स्वदेशी लसीसाठी केंद्र सरकारने देण्यात येतील 1500 कोटी रुपये
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) प्रभाव कमी होताना दिसत आहे. मात्र संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने पुढील धोका टाळण्यासाठी लसीकरण (Vaccination) वेगाने होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने अजून एका भारतीय बनावटीच्या लसीला निर्मितीसाठी मंजूरी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हैद्राबादच्या बायोलॉजिकल-ई (Biological-E) या कंपनीने कोविड-19 लसीचे 30 कोटी डोसेस बनवण्यासाठी करार केला आहे. यासाठी सरकारकडून बायोलॉजिकल-ई कंपनीला 1500 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करण्यात येणार आहे.

RBD हे प्रोटीन सब युनिट व्हॅसिन बायोलॉजिकल-ई कडून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान बनवले जाणार आहे. या लसीच्या सध्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स सुरु असून पुढील काही महिन्यांमध्ये ही लस उपलब्ध होईल, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. (SII कडून Sputnik V कोविड लसीच्या निर्मितीसाठी DCGI कडे टेस्ट लायसंस करिता परवानगीचा अर्ज -सूत्र)

जॉन्सन अँड जान्सनच्या कोविड-19 लसीचे 60 कोटी डोसेस बनवण्याचा करार देखील बायोलॉजिकल-ई कंपनीने घेतला आहे. यासोबतच कॅनडाच्या एमआरएने कोविड-19 लसीचे भारतात उत्पादन करण्यासाठी करार केला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले.

लस तयार झाल्यानंतर बायोलॉजिकल-ई कडून लसीचे क्लिनिकल ट्रायल घडवून लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली, असा प्रयत्न असेल. (COVID-19 Vaccination in India: भारतातील कोविड-19 लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल- प्रकाश जावडेकर)

दरम्यान, सध्या देशात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड या दोन लसी लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असून लवकरच या लसीचा देखील लसीकरण मोहिमेत अंतर्भाव करण्यात येईल. त्याचबरोबर बायोलॉजिकल-ई ची लस देखील स्वदेशी लस म्हणून मोहिमेत सहभागी होईल.