केंद्राकडून कोरोनावरील रेमिडेसिव्हर औषधांच्या निर्यातीवर बंदी, जाणून घ्या त्यामागील कारण
Remdesivir (Photo Credits: ANI)

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अशातच आता रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir Injection)  तुटवडा भासू लागला आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकारकडून रेमिडेसिव्हर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. लोकांना आणि रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने काही पाऊले उचलली आहेत. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की, येत्या कागी दिवसात रेमिडेसिव्हर इंजेक्शनची मागणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स औषधांच्या निर्मात्यांसह संपर्कात केंद्र सरकार असून त्यांना रेमिडेसिव्हरच्या उत्पादनाला चालना देण्यास प्रोत्साहन करणार आहे.(Coronavirus Vaccine: लस घेतल्यानंतर सुद्धा नागरिकांना होऊ शकते COVID19 ची लागण, अदर पुनावाला यांनी सांगितले कारण)

भारत सरकारकडून रेमिडेसिव्हर सर्व स्वदेशी निर्माते आपल्या वेबसाइटवर त्याचा वापर करण्यासाठी त्यांचे स्टॉकिस्ट बद्दल सल्ला देत आहेत. ड्रग्ज इंस्पेक्टर आणि अन्य अधिकाऱ्यांनी स्टॉक सत्यापित करण्यासह होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी काही उपाययोजना सुद्धा केल्या आहेत. गेल्या दिवसात देशात कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर रेमिडेसिव्हरचा वापर केला जा आहे. मात्र काही ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.(COVID-19 Vaccination in India: भारताने लसीकरणात गाठला 10 कोटींचा टप्पा; ठरला सर्वात वेगवान देश)

Tweet:

कोरोनाच्या संक्रमणासाठी महत्वपूर्ण असणारे रेमिडेसिव्हर इंजेक्शनच्या 284 बॉटल्ससह दोन जणांना मुंबईत अटक करण्यात आले आहे. तर गेल्या शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली होती. एका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, गुन्हे शाखेची एक्स युनिटने गुरुवारी संध्याकाळी अंधेरी पूर्व येथून सरफराज हुसैन नावाच्या व्यक्तीकडून 12 रेमिडेसिव्हर इंजेक्शनच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत.