केंद्र सरकारकडून 2021-22 या वर्षासाठी EPF ग्राहकांसाठी व्याजादर 8.1% ठरवण्यात आल्याची माहिती PTI वृत्ताच्या आधारे देण्यात आली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर व्याजदर अधिसूचित केला जातो, त्यानंतर व्याज त्याच्या ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. मार्च महिन्यात EPFO ठेवींवरील व्याज दर 2021-22 आर्थिक वर्षासाठी 8.1% जो चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आणला होता, मागील वर्षी हाच दर 8.5% होता.
1977-78 नंतरचा हा सर्वात कमी व्याजदर आहे जो कर्मचार्यांनी त्यांच्या निवृत्ती निधीसाठी ठेवलेल्या ठेवींवर आहे. त्या वर्षी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के होता. हे देखील नक्की वाचा: PF Account मध्ये 2.50 लाखापेक्षा अधिकच्या बचतीवर कसा लागणार टॅक्स; इथे जाणून घ्या नियम.
PTI Tweet
Govt approves 8.1 pc rate of interest on employee provident fund deposits for 2021-22: EPFO office order
— Press Trust of India (@PTI_News) June 3, 2022
EPFO आपल्या वार्षिक जमा रकमेपैकी 85 टक्के सरकारी सिक्युरिटीज आणि बाँड्ससह कर्ज साधनांमध्ये आणि 15 टक्के ETF द्वारे इक्विटीमध्ये गुंतवते. कर्ज आणि इक्विटी या दोन्हींमधून मिळणारी कमाई इंटरेस्ट पेमेंट म्हणून वापरली जाते.
कर्मचारी आणि कंपनी दोघे मिळून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवल्या जाणार्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) मासिक आधारावर मूळ पगाराच्या 24% आणि महागाई भत्त्याचे योगदान देतात. एकदा का कोणत्याही आर्थिक वर्षाचा व्याजदर अधिसूचित केला गेला आणि चालू वर्ष संपले की, EPFO महिन्यानुसार क्लोजिंग बॅलन्स आणि नंतर संपूर्ण वर्षाचे व्याज मोजते. खाते निष्क्रिय झाल्यापासून सदस्यांच्या खात्यात कोणतेही व्याज जमा केले जात नाही.