केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून मागणी होत असून सरकारने कर्मचारी संघटनांशी याबाबत चर्चा केली आहे. आठवा वेतन आयोग लागू झाला तर पेन्शनधारकांनाही याचा लाभ होणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतही पुष्टी झालेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जानेवारी 2026 नंतर आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. दर 10 वर्षांनी केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जाते. आयोगाच्या सूचना आणि सल्ल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल केले जातात. (हेही वाचा -State Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ‘मोठी’ वाढ, सहा महिन्यांची थकबाकीही मिळणार)
दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यानुसार आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 मध्ये लागून होण्याची शक्यता आहे. जर सरकार मध्ये आठवा वेतन लागू करत असेल तर त्यासाठी आयोगाची स्थापना करावी लागणार आहे. सरकारी कर्मचारी संघटनेने फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवण्याची विशेष मागणी केली होती. मात्र सरकारने ती वाढवून 2.57 करण्याचा निर्णय घेतला होता. फिटमेंट फॅक्टरमध्ये पगार आणि पेन्शनची गणना केली जाते.
फिटमेंट फॅक्टरची पद्धत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन मोजण्यासाठी वापरली जाते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक अशी संख्या आहे ज्याने गुणाकार केल्यास कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढतो. त्याचप्रमाणे त्याचा एकूण पगारही ठरलेला असतो. नवीन वेतन आयोग तयार झाल्यावर या फॅक्टरमध्ये बदल होतो. या बदलामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढून त्यांचे इतर भत्तेही वाढतात.