BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हरियाणा विधानसभा निवडणूक (Jammu-Kashmir Assembly Elections Results) आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu-Kashmir Assembly Elections Results) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे. या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण, निकाल काहीही आला तरी त्याचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर या राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला तर देशातील भाजप शासीत राज्यांची संख्या वाढणार आहे. पराभव झाला तर त्याचा केंद्र सरकारच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण होईल. तसेच, आगामी महाराष्ट्र विधानसभेवरही पहिणाम होतील. म्हणूनच जाणून घेऊया देशातील भाजपशासित राज्यांची संख्या.

भाजप आणि मंत्रपक्षांची (NDA) सत्ता असलेली राज्ये:

असम, अरुणाचल प्रदेश, बिहार (JDU) छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, ओडिशा, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मेघालय (NDA), नगालैंड (NDA), सिक्किम (SDF)

काँग्रेस पक्षाची सत्ता असलेली राज्ये: हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पुदुचेरी (AINRC), तमिलनाडु (DMK), तेलंगाना (CONG)

प्रादेशिक आणि इतर पक्षांची सत्ता असलेली राज्ये: आंध्र प्रदेश (TDP), दिल्ली (AAP), झारखंड (JMM), केरळ (CPM), मिजोरम ZPM (गुटनिरपेक्ष), पंजाब (AAP), पश्चिम बंगाल (TMC), जम्मू-कश्मीर (President's Rule) (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: 'कामं निश्चित वेळेत करणं अवघड'; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं)

दरम्यान, जम्मू आणि कश्मीर राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. तर, हरियाणा राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हातील आलेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये एकूण 90 जागांपैकी भाजपने 29 जागा जिंकल्या असून जवळपास 20 जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने 28 जागा जिंकल्या असून आठ जागांवर आपली आघाडी कायम ठेवली आहे. उर्वरीत ठिकाणी दोन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. उर्वरीत एका जागेवर अपक्ष तर दोन ठिकाणी Indian National Lok Dal - INLD पक्ष आघाडीवर आहे.