Bird Flu: बर्ड फ्लू च्या कारणामुळे काही राज्यात पोल्ट्री व्यवसायवर बंदी
Photo Credit : Pixabay

Bird Flu: कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या दरम्यान आता विविध राज्यात बर्ड फ्लू चे संक्रमण पसरत चालले आहे. त्यामुळे बर्ड फ्लू पासून सुटका मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याच कारणास्तव जम्मू कश्मीर, मध्य प्रदेशासह काही राज्यात पोल्ट्री व्यवसायवर बंदी घालण्यात आली आहे. देशातील काही राज्यात पोल्ट्री, कावळे आणि स्थलांतरित पक्षांचा मृत्यू होत असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. या संक्रमणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी असे म्हटले की, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने दिल्लीत कंट्रोल रुम तयार केले आहे. जे राज्यांच्या संपर्कात राहणार आहेत. भारतात पहिल्यांदाच 2006 मध्ये एवियन इंफ्लुएंजाची प्रकरणे समोर आली आहेत.

केरळ, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील परिस्थिती पाहता केंद्राने राज्यांसह बैठक घेतली आणि परिस्थिती संदर्भात आढावा घेतला. त्यामुळे बर्ड फ्लू संक्रमणामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे राज्यांसह केंद्र शासियत प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये मृत पक्षांचा आकडा 15 लाखांच्या जवळ पोहचला आहे. फक्त हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लू मुले 3 हजार स्थलांतरित पक्षांचा मृत्यू झाला आहे.(Bird Flu: भारतात बऱ्याचदा बर्ड फ्लू चा आजार येतो कसा? जाणून घ्या कारण)

तर महाराष्ट्रात सुद्धा पशुपालन विभागाचे मंत्री सुनिल केदार यांनी असे म्हटले की, राज्य सरकारने रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना कठोरपणे लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. आम्ही अन्य राज्यात शेकडो पक्षांचा मृत्यू झाल्याने सतर्क झालो आहोत. ठाण्यात जवळजवळ 10-12 पक्षांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यांची चाचणी केली असता त्यांचे बर्ड फ्लू ची चाचणी निगेटिव्ह आली आहे.