Nitish Kumar Resigns: नीतीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; भाजपला धक्का देत RJD, काँग्रेस डाव्यांसोबत स्थापन करणार नवे सरकार
Nitish Kumar | | (Photo Credit - Facebook)

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला आहे. राजभवन येथे जाऊन नीतीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. नीतीश कुमार यांना 160 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांनी तसे पत्रही राज्यपालांना दिले आहे. त्यासोबतच नवे सरकार स्थापन करण्याचा दावाही त्यांनी केला आहे. जेडीयु आणि भाजप यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याची परिनिती नीतीश कुमार यांच्या राजीनम्यात झाली. जनता दल युनायटेड (JDU ) पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्यासोबत मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आगोदरच भाजपसोबत (B) आघाडी तोडण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि जनता दल युनायडेट असे संयुक्त सरकार स्थापन केले जाण्याची चर्चा आहे. सोबत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही घेतले जाईल.

राज्यपालांकडे राजीनामा सोपविल्यानंतर नीतीश कुमार हे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या निवसस्थानी थेट पोहोचले. या वेळी तेजस्वी यादवही उपस्थित होते. काँग्रेस आमदार अजीत शर्मा यांनी म्हटले की, महागठबंदन यांनी नीतीश कुमार यांना नेता मानले आहे. महागठबंधनसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. शपथ ग्रहण समारंभ बुधवारी होईल. जेडीयूच्या बैठकीत नीतीश कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नीतीश कुमार यांनी म्हटले की, भाजपने आम्हाला (जेडीयू) संपविण्याचा कट रचला होता. भाजपने नेहमीच आम्हाला अपमानीत केले आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Bihar Political Crisis: भाजपला धक्का? बिहारमध्ये नीतीश कुमार सरकार कोसळण्याच्या वाटेवर; RJD, JDU जुळवणार नवी समिकरणे, मुख्यमंत्र्यांनी मागितली राज्यपालांची वेळ, घ्या जाणून)

दरम्यान, बिहारमध्ये एकत्र सत्तेत राहिलेल्या दल यूनायटेड (जेडीयू) आणि भाजप यांच्यात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. हा तणाव अत्युच्च टोकाला गेला होता. नीतीश कुमार यांचे म्हणने होते की, केंद्रीय मंत्री अमित शाह सातत्याने जेडीयूमध्ये फूट पाढण्यासाठी काम करत होते. अमित शाह हे सातत्याने जेडीयुचे माजी नेते आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून सातत्याने जेडीयूमध्ये फूट पाडण्यासाठी कारस्थान करत होते.

जेडीयूकडून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यांतर आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पुढे ते अमित शाह यांचा मोहरा म्हणून काम करु लागले असेही नीतीश कुमार म्हणाले. आरसीपीसिंह हे जनता दल युनायटेडच्या कोट्यातून 2017 मध्ये राज्यसभेवर गेले होते. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले. परंतू, पुढे राज्यसभेची मुदत संपल्यावर नितीश कुमार यांनी त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली नाही. परिणामी आरसीपीसिंह यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून सिंह आणि नितीश कुमार यांच्यात एक सुप्त संघर्ष पाहायला मिळाला आहे.