Rape Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

बंगळुरु (Bengaluru News) पोलिसांनी 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार (Case Bengaluru) केल्याच्या आरोपाखाली 30 वर्षीय बॅडमिंटन प्रशिक्षकाला अटक (Badminton Coach Arrested) केली आहे. पीडितेच्या मोबाीलमध्ये तिच्या आजीला काही आक्षेपार्ह फोटो आढळले. त्यानंतर सदर प्रकरणाचा भांडाफोड झाला. पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक केली. पीडितेने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ती तिच्या आजीकडे राहत होती. पोलिसांच्या अहवालात असे दिसून आले आहे की, मुलीने तिच्या आजीच्या फोनचा वापर करून प्रशिक्षकाला स्वतःचा एक अश्लील फोटो पाठवला होता.

पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार

आजीच्या फोनवरुन पीडितेने बॅडमिंटन प्रशिक्षकास फोटो पाठविल्याचे आजीच्या लक्षात येताच तिने मुलीच्या पालकांना माहिती दिली. आजी आणि पीडितेच्या पालकांनी पीडितेशी संवाद साधला. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने खुलासा केला की, बंगळुरु येथील प्रशिक्षक अतिरिक्त प्रशिक्षण सत्रे देण्याच्या बहाण्याने प्रशिक्षक तिचे शोषण करत होता. पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमध्ये एकटा राहणाऱ्या आरोपीने मुलीला अनेक वेळा त्याच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि अत्याचाराबद्दल मौन बाळगण्याची धमकी दिली. मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती समजताच संतापलेल्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि शनिवारी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली. (हेही वाचा, HC On POCSO Act: लैंगिक इच्छेशिवाय अल्पवयीन मुलीचे ओठ दाबणे, स्पर्श करणे आणि तिच्यासोबत झोपणे हा POCSO अंतर्गत गुन्हा नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई?

अधिकाऱ्यांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) लागू असलेल्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे वय पाहता, तपासकर्ते लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत आरोप लागू होतील का, याचाही तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत, प्रशिक्षकाने कथितपणे हल्ल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. (हेही वाचा - Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी)

ही घटना भारतात अल्पवयीन मुलांविरुद्ध सुरू असलेल्या गुन्ह्यांचा मुद्दा अधोरेखित करते. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) मधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की केवळ 2022 मध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत 47,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, ज्यामुळे बाल संरक्षण उपाययोजनांची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. अनेकदा केवळ मदत न माहितल्याने किंवा होत असलेल्या अन्याय, अत्याचाराबाबत वेळीच वाच्यता न केल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढते. पीडितेवरील अन्याय आणि त्रासही वाढतो. त्यामुळे अशा घटनांना वेळीच विरोध करुन कायदेशीर मदत मिळवणे महत्त्वाचे ठरते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.