Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखली बॉम्बस्फोट (Ahmedabad Serial Blast Case) प्रकरणी गुजरात न्यायालयाने आज (8 फेब्रुवारी) निर्णय दिला. न्यायालयाने या प्रकरणात 49 आरोपींना दोषी ठरवले तर 28 जणांची निर्दोष सुटका केली. दोषी ठरविण्यात आलेल्या सर्व आरोपींना उद्या (9 फेब्रुवारी) सकाळी 10.30 वाजता शिक्षा ठोठावली जाणार आहे. या प्रकरणाचा निकाल 2 फेब्रुवारी रोजीच येणार होता. मात्र, 30 जानेवारीला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल हे कोरोना व्हायरस संक्रमित झाले. त्यामुळे निर्णयाची जाहीर करणे पुढे ढकलण्यात आले.

गुजरातमध्ये 26 जुलै 2008 मध्ये अहमदाबाद नकर पालिका परिसरात एका तासात जवळपास 21 साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला. तर 200 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट होण्याची घटना देशात यापूर्वी घडली नव्हती. पोलिसांनी अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल केला. तर सूरत येथे 15 इतर गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी अनेक ठिकामी केलेल्या तपासात जिवंत बॉम्बही आढळून आले. (हेही वाचा,Gurmeet Ram Rahim Furlough: बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीमला निवडणुकीपूर्वी मिळाली 21 दिवसांची रजा )

न्यायालयाने सर्व 35 गुन्ह्यांमध्ये दाखल एफआयआरचे एकत्रिकरण करुन खटला चालवला. कारण, या प्रकरणात पोलिसांनी दावा केला होता की, ही घटना एका कटाचा भाग होती. या बॉम्बस्फोटानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सर्व दहशतवाद्यांना शोधून अटक करण्याचे आदेश दिले होते. गुजरातचे तत्कालीन डीजीपी आशीष भाटिया यांच्या नेतृत्वाखाली एका कार्यक्षम अधिकाऱ्यांचे पथक बनविण्यात आले. स्फोटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह 27 तारखेला अहमदाबादच्या दौऱ्यावर आले होते.

पंतप्रधान मनमोहन सिंह आल्यानंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक टीम बनविण्या आली. त्यानंतर अवघ्या 19 दिवसांमध्ये 30 दहशतवाद्यांना अटक झाली. त्यानंतर पुढील काही काळात गुजरात पोलिसांनी वेळोवेळी बाकीच्या दहशतवाद्यांना अटक केली. अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना होती. या संघटनेनेच आपल्या दहशतवाद्यांना जयपूर आणि वाराणसी येथे बॉम्बस्फोट करण्याचे आदेश दिले होते. देशातील अनेक राज्यांचे पोलीस या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी जंग जंग पछाडत होते.