7th Pay Commission (File Image)

7th Pay Commission Updates: भारतामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेल्या वेतनवाढीनंतर भारतीय रेल्वे कर्मचार्‍यांचे पगार सुमारे 14 ते 26% वाढल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Union Railways Minister Piyush Goyal) यांनी दिली आहे. भारतात केंद्रीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग 2016 साली लागू करण्यात आला आहे. त्यानंतर वेतन आयोगाच्या शिफारसींवर विचार सुरू आहे. दरम्यान संसदेमध्ये कॅग रिपोर्टची माहिती देताना, सातव्या वेतन आयोगानुसार लोअर ग्रेडच्या कर्मचार्‍यांचा पगार 14% तर अप्पर ग्रेडच्या कर्मचार्‍यांचा पगार 26 % वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. 7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना 'किमान वेतन वाढ' प्रस्तावाला मंजुरी देत नववर्षाची भेट देणार?

भारतीय रेल्वेच्या व्यवहाराची संसदेमध्ये माहिती देताना पियुष गोयल यांनी सातव्या वेतन आयोगानंतर रेल्वेच्या कर्मचार्‍यांसाठी सुमारे 22,000 कोटी वापरले जात असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान हे सामान्य असल्याचेही ते संसदेमध्ये म्हणाले आहेत. रेल्वेची ऑपरेटींग कॉस्ट मागील म्हणजे 6व्या वेतन आयोगानंतर 15% वाढली होती. 7th Pay Commission: सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत ग्रॅज्युटी नियमात बदल; लाखो कर्मचाऱ्यांना मिळतोय अधिक फायदा.

कॅग रिपोर्टनुसार भारतीय रेल्वेच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये भारतीय रेल्वेचा ऑपरेटिंग रेशो 90.49% वाढला होता. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये हा 96.5 तर 2017-18 मध्ये हा 98.44 % इतका वर गेला होता. दरम्यान भारतीय रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017-18 मध्ये रेल्वे ऑपरेशनल कॉसट वाढण्यामागे सातव्या आयोगच्या शिफरशीनुसार वाढलेला रेल्वे कर्मचार्‍यांचा पगार असू शकतो.

भारतामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, आता किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव अद्याप प्रतिक्षेत आहे. लवकरच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी केंद्रीय कर्मचार्‍यांना आशा आहे.