Aadhar Card वरील क्रमांक खरा की खोटा तपासून पाहण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा
Aadhar Card (Photo Credits: PTI)

सध्याच्या काळात प्रत्येकालाच आधार कार्डची कोणत्या ना कोणत्या कामासाठी त्याची गरज भासते. ऐवढेच नाही तर साधे एखाद्या बँकेत खाते सुरु करयाचे असल्यास तरीही प्रथम आधार कार्ड विचारले जाते. ऐवढेच नाही जर तुम्हाला तुमचे दुकान किंवा घर भाड्याने द्यायचे असल्यास त्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आधार कार्ड मागतात. कारण आधार कार्डवरील क्रमांक हा बायोमेट्रिक डेटावर आधारित असतो. त्यामुळे व्यक्तीला पुन्हा आधार कार्ड बनवता येत नाही.(Aadhar Card: Phone Number शी लिंक नसलेलं आधार कार्ड हरवलं तरी काळजी नको, 'या' स्टेप्स वापरुन पुन्हा मिळवा तुमचा आधार)

फसवणूकीचे प्रकार घडवून आणण्यासाठी काही लोक आधार कार्ड वरील क्रमांक बदलून नवे प्लास्टिक आधार कार्ड तयार करतात. त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही एखाद्याचे कार्ड घेण्यापूर्वी ते तपासून पहा. तसेच आधार कार्डवरील क्रमांक योग्य आहे की नाही ते सुद्धा जरुर पहा. आधार कार्ड वरील क्रमांक स्विकार करण्यापूर्वी त्याची सत्यता पटवून घ्या. कारण भविष्यात त्या व्यक्तिला तुम्ही सहज ट्रेस करु शकता. Aadhar Card देणाऱ्या संघटनेकडून UIDAI आधार क्रमांकसह मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी द्यावा लागतो. त्यामुळे या संबंधित प्रक्रिया सोप्या होतात. (आधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या)

तर जाणून घ्या कशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड वरील क्रमांक खरा आहे की खोटा कसा तपासून पहाल-

>> सर्वात प्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर लॉगिन करा.

>> वेबसाईटवर तुम्हाला My Aadhar टॅब तुम्हाला दिसेल.

>> यामध्ये तुम्हाला Aadhar Services येथे जायचे आहे.

>> तेथे गेल्यावर Verify an Aadhar Number ऑप्शन दिसून येणार आहे.

>>Verify an Aadhar Number वर क्लिक करा

>> येथे 12 अंकी आधार क्रमांकासह कॅप्चा कोड द्या. त्यानंतर Proceed to Verify वर क्लिक करा.

एखाद्या व्यक्तीकडून देण्यात आलेला आधार कार्डवरील क्रमांक सत्य असल्यास तुम्हाला व्यक्तीचे वय, लिंग, राज्य आणि मोबाईल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक समोर येतील. त्यानुसार तुम्ही आधार कार्डवर दिलेला क्रमांक आणि तुमच्याकडे आलेला डेटा तपासून पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डवरील क्रमांक खरा आहे की खोटा हे समजून येईल.