अहमदाबाद येथे तीन मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची शक्यता, बचावकार्य सुरु
अहमदाबाद येथे इमारत कोसळली (फोटो सौजन्य-ANI)

गुजरात (Gujrat) मधील अहमदाबाद (Ahmedabad) येथे एक तीन मजली इमारत कोसळली असल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमराईवा़डी मधील बंगालवाली चाळीच्या ठिकाणी इमारत कोसळली आहे. या प्रकरणी एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट देत मृत व्यक्तीच्या परिवाराला 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचसोबत मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार असल्याची हे केजरीवाल यांनी म्हटले आहे.(पंजाब: गुरदासपूर फटका कारखान्यात भीषण स्फोट; 23 जणांचा मृत्यू, मदत आणि बचावकार्य सुरूच)

ANI ट्वीट:

तसेच अवैध पद्धतीने उभारलेल्या गेलेल्या इमारतींची तपासणी करुन दोषी व्यक्तींवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. यापूर्वी सुद्धा अहमदाबाद मझझीस एका ठिकाणी पाण्याची टाकी कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला होता.