पंजाब: गुरदासपूर फटका कारखान्यात भीषण स्फोट; 23 जणांचा मृत्यू, मदत आणि बचावकार्य सुरूच
गुरदासपूरच्या फटाका कारखान्यात स्फोट (Photo Credits: Twitter)

पंजाब (Punjab) मधील गुरदासपूर (Gurdaspur) येथे बुधवारी दुपारी झालेल्या एका फटाका कारखान्यात मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्यानंतर कमीतकमी 50 जण अडकले. आतापर्यंत 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी मदत आणि बचाव कामात गुंतले आहेत. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी जोरदार स्फोटानंतर गुरदासपूरच्या बटाला भागात असलेल्या कारखान्यात सर्व काही नष्ट झाले. या भीषण अपघातात डझनाहून अधिक लोक ठार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. (गुरदासपूर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 19 जणांचा मृत्यू; पंजाब सरकारने 2 लाख अनुदान केले जाहीर)

पोलिस महानिरीक्षक (सीमा रेंज) एसपीएस परमार यांनी सांगितले की, रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. स्थानिक लोक म्हणाले की स्फोट इतका जोरदार होता की कारखान्याच्या आसपासच्या इमारतींनाही मोठा नुकसान झाला आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) म्हणाले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक मदतकार्यात गुंतले आहेत. अद्याप बचावकार्य चालू आहे परंतु, या अपघातामागील कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. वृत्तानुसार, ज्या कारखान्यात स्फोट झाला तो म्हणजे गुरदासपूर फटका फॅक्टरी. तथापि, कारखाना वैध होता की नाही याची पुष्टी झालेली नाही. तपासणीनंतरच घटनेची कारणे समोर येतील. अमरिंदर सिंह यांनी मृतांच्या नातलगांसाठी 2 लाख आणि गंभीर जखमी झालेल्या सात जणांना ज्यांना अमृतसर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले त्यांना 50,000 रुपये देण्यात येतील. आणि किरकोळ जखमी झालेल्यांसाठी 25 हजार रुपये जाहीर केले. शिवाय सिंग यांनी बटाला येथील फटाका कारखाना स्फोटात दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.