8th Pay Commission | (Photo credit: archived, edited, representative image)

केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) स्थापना अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संभाव्य वेतन रचनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नवीन वेतन पॅनेल डिसेंबर 2025 मध्ये आपला कार्यकाळ संपणाऱ्या ७ व्या वेतन आयोगाचे उत्तराधिकारी असेल. पुढील पाऊल म्हणून, केंद्र लवकरच 8 व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांची नियुक्ती करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान,, लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अपेक्षित फिटमेंट फॅक्टर आणि सुधारित वेतन मोजण्यापूर्वी महागाई भत्ता (डीए) मूळ वेतनात विलीन केला जाईल का? सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाकडून कोणत्या आपेक्षा ठेऊ शकतात? अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, DA Merger होईल?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी विविध मुद्द्यांची चर्चा आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक असा गुणोत्तर आहे, ज्याच्या मदतीने सर्व वेतन स्तरांवर एकसमान वाढ केली जाते. यामध्ये महागाई भत्ता आणि जीवनमान वाढ यांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ, 7व्या वेतन आयोगात (जनवारी 2016 पासून अंमलात आलेला), 2.57 फिटमेंट फॅक्टर वापरला गेला. त्या वेळी कर्मचाऱ्यांना 125% DA मिळत होता, जो मूळ पगारात समाविष्ट करून त्यावर ही वाढ लागू केली गेली. यामुळे 14.22% प्रत्यक्ष वेतनवाढ झाली. (हेही वाचा, 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि डीए गणना; घ्या जाणून)

उदाहरणार्थ (7वा आयोग):

मूळ पगार: 10,000 रुपये

DA (125%): 12,500 रुपये

एकूण: 22,500 रुपये

14.22% वाढ: 3,199.50 रुपये

नवीन पगार: 25,700 रुपये

फिटमेंट फॅक्टर: 2.57

मागील वेतन आयोगांमधील DA मर्जर आणि फिटमेंट फॅक्टरचा ट्रेंड

पाठिमागच्या आयोगांमध्ये खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडली होती:

वेतन आयोग

DA मर्जरच्या वेळी फिटमेंट फॅक्टर

5वा (1996)

74%

1.86

6वा (2006)

115%

1.86 + ग्रेड पे

7वा (2016) 125%

2.57

 

5व्या आणि 6व्या वेतन आयोगात, DA प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मूळ पगारात समाविष्ट करून मग फिटमेंट फॅक्टर लावला गेला. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना न्याय्य आणि महागाईनुसार वाढ मिळाली. (हेही वाचा, 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, सरकारकडून पॅनेल सदस्यांची अद्यापही घोषणा नाही, अंमलबजावणीची शक्यता धुसर)

तज्ज्ञांच्या मते, 8व्या वेतन आयोगातही याच पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे, जशी मागील आयोगांमध्ये होती – म्हणजे सध्याचा DA आणि मूळ पगार एकत्र करून त्यावर प्रत्यक्ष वाढ करून नवीन वेतन ठरवले जाईल. सध्या DA 50% च्या जवळपास आहे आणि तो 2025 पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.