दिमापूर येथील बर्मा कॅम्पजवळ आज सुरक्षा दलांनी NSCN (K-NK) च्या एका सक्रिय केडरला अटक केली; 4 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Sep 04, 2020 11:31 PM IST
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीने देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात 83,883 तर नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुशे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 38 लाख 53 हजार 406 वर पोहोचला आहे. याशिवाय मागील 24 तासांमध्ये देशात 67 हजार 584 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
याशिवाय गुरूवारी दिवसभरात 18,105 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. तसेच 391 जणांचा कोरोनामुळे बळी केला. देशात कोरोनाच्या संकटाबरोबरचं काही भागात पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सीबीआयकडून अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) छापा टाकला आहे. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली. रिया-शोविक ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. सध्या तीच्या एनसीबीकडून रियाच्या घराची झाडाझडती सुरु आहे.