राजस्थानमध्ये रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकाने, हार्डवेअर, ऑटोमोबाईल विक्रीची दुकाने इ. उघडली जाण्याची शक्यता; 13 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
May 13, 2020 11:50 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईसाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. देशाच्या GDP च्या 10% असणारे हे पॅकेज मुख्यतः जमीन, कामगार, लिक्विडीटी या मुद्द्यांना धरून काम करेल. शेतकरी, कामगार वर्ग, लघुउद्योग, कुटीर उद्योग, यासाठी मदत देणाऱ्या या पॅकेज मधून देशाला आत्मनिर्भर बनवण्याची सुरुवात करत आहोत असेही मोदींनी सांगितले आहे. या आर्थिक पॅकेज चे वाटप कशाप्रकारे होणार याबाबत मात्र अजून केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे काल पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन 4 (Lockdown 4.0) संदर्भात सुद्धा घोषणा केली. सध्या सुरु असणारे लॉक डाऊन 17 मे ला संपत आहे, त्याआधी देशवासियांना वाढीव लॉक डाउनच्या तारखा कळवल्या जातील, मात्र या तिन्ही लॉक डाऊन पेक्षा वेगळे नियम यावेळेस फॉलो करावे लागणार आहेत असे मोदींनी म्हंटले आहे. Lockdown: लॉकडाऊन वाढविण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दुसरीकडे देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक दुप्पट वेगाने वाढत आहे. सद्य घडीला देशात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ही 70,756 इतकी असून यापैकी 46, 008 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 2293 जणांचा मृत्यू झाला आहे तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा 22, 454 इतका आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काल दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ही 31% आहे तर तुलनेने मृत्युदर हा खूपच कमी आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आज वर 24 हजाराहून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची ख्या ही 5,125 इतकी आहे.