Lockdown: लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

लॉकडाऊन (Lockdow) शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, अस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रण, उपाययोजना आणि लॉकडाऊन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आरोग्य व आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना केली. (हेही वाचा, Coronavirus In Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसची 426 नवीन प्रकरणे; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 14,781 वर)

ट्विट

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या वेळी माहिती दिली की, राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्ली-मुंबई रेल्वे सुरु होत आहे. आपण मजुरांची नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवत आहोत. एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविले आहे, असेही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.