Coronavirus In Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसची 426 नवीन प्रकरणे; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 14,781 वर
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन 1026 प्रकरणांची व 53 मृत्यूंची नोंद झाली. यासह राज्यात एकूण रुग्णांची संख्या आता 24,427 वर पोहोचली आहे, यात 921 मृत्यूंचा समावेश आहे. यामध्ये देशाची राजधानी मुंबई (Mumbai) सर्वाधिक बाधित शहर आहे. आज मुंबईमध्ये कोरोना व्हायरसची 426 नवीन प्रकरणे समोर आली आहे, यासह शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 14,781 वर पोहोचली आहे. आजच्या 28 अधिक मृत्युंसह आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे एकून 556 लोकांचे बळी गेले आहेत. आज एकूण 613 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

एएनआय ट्विट -

राज्याच्या बाबतील एक दिलासादायक बातमी म्हणजे कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केलेल्या 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी कोरोना विषाणूचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची ही विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावावर झाली आहे. मुंबईमध्ये आज 203 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत व आतापर्यंत एकूण 3313 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज मुंबईमध्ये 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण 556 जणांचा मृत्यू झाला आहे.

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिका अथक प्रयत्न करित आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाची तीव्र बाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'इंजेक्शन टोसीलुझूमॅब' (Tocilizumab) या नवीन औषधाचा उपयोग सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 40 रुग्णांना हे औषध देण्यात आले आहे व त्यापैकी 30 रुग्णांमध्ये या औषधामुळे चांगले परिणाम आढळून आले आहेत. तसेच 14 रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज झाले आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज दिवसभरात 1026 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद, 53 जणांचा मृत्यू)

या औषधामुळे रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर झालीच आहे, सोबत त्यांना व्हेंटीलेटर लावण्याची आवश्यकता भासली नाही. जगभरातील विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्णालये यांच्या अनुभवांच्या आधारे या औषधाचा उपयोग करण्यात आला आहे. धारावीच्या 3 पैकी 1 पुरुष या औषधाच्या उपचारामुळे पूर्णपणे बरा होऊन नायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.