Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 1026 कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद, 53 जणांचा मृत्यू
COVID 19 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज (12 मे 2020) दिवसभरात एकूण 1026 जणांची नोंद कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित म्हणून झाली. तर, कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमित 53 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 24427 इतकी झाली आहे. यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण 921 कोरोना संक्रमितांचाही समावेश आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 14781 इतकी झाली आहे. मुंबईत आज दिवसभरात 426 कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर 28 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित 14781 रुग्णांमध्ये एकूण 556 मृतांचा, तसेच उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 203 जणांचाही समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतून एकूण 3313 कोरोना संक्रमित रुग्णांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: धारावीत आज 46 नव्या कोरोना रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारताचा विचार करता भारतात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 46008 इतकी झाली आहे. त्यातील 2293 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने 22454 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 70756 इतकी झाली आहे.