Coronavirus: धारावीत आज 46 नव्या कोरोना रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू
Dharavi slums in Mumbai. (Photo Credit: PTI)

Coronavirus: धारावीत (Dharavi) आज 46 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीत सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 962 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

मुंबईतील धारावी हा परिसर कंन्टेंटमेंट झोनमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही गोष्टी सुरु करण्यास परवानगी नाही. सध्या धारावीत पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. धारावीत लोक दाटीवाटीत राहतात. त्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे. परिणामी या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. (हेही वाचा - Liquor Home Delivery: आता दारु मिळणार घरपोच! दुकानांसमोरील गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय, 14 मे पासून सुरु होणार अंमलबजावणी)

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईमध्ये सोमवारी 791 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोग्रस्तांचा एकूण आकडा 14355 वर पोहोचला आहे. यातील 3110 जणांची प्रकृती सुधारली असून 528 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दरम्यान,  महाराष्ट्रात आज नवे 1230 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 23,401 वर पोहचला आहे.