पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधीत केले. कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीरव ते बोलत होते. या वेळी लॉकडाऊन कालावधी वाढणार की संपणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता पंतप्रधान मोदी यांनी कायम ठेवली. लॉकडाऊन कालावधीबाबत येत्या 18 मे पूर्वी देशातील जनतेला सांगितले जाईल असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी बोलताना म्हणाले की, देशातील चौथा लॉकडाऊन हा अतिशय वेगळ्या रुपातील असेल. देशातील विविध राज्यांनी केलेल्या सूचना आणि नव्या नियमांसह हा लॉकडाऊन असेल. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतील. मात्र, त्याबाबतची माहिती 18 मे पूर्वी देण्यात येईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना जाहीर केले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज)
एएनआय ट्विट
Based on the suggestions by states, information related to lockdown 4 will be given to you before 18th May. We will fight Corona and we will move forward: PM Narendra Modi #COVID19 https://t.co/PVUzknCKVV
— ANI (@ANI) May 12, 2020
दरम्यान, जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोनाशी लढायचे तर लॉकडाऊन आवश्यक आहे. पण, लॉकडाऊन घेत कोरोनाशी लढत आम्ही आमचे आयुष्य पणाला लाऊ शकत नाही. त्यासाठी मास्क वापरून आणि विविध उपाययोजना करत आपण नव्याने सुरुवात करायला हवी, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.